साताऱ्यात मुस्लीम बांधवांच्या मोर्चात ‘भारत माता की जय’
By Admin | Updated: March 18, 2016 23:56 IST2016-03-18T22:12:53+5:302016-03-18T23:56:38+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ओवेसी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

साताऱ्यात मुस्लीम बांधवांच्या मोर्चात ‘भारत माता की जय’
सातारा : भारतीय मुस्लीम समाजाची दिशाभूल करणाऱ्या एमआयएम पक्षाचे ओवेसी यांचा निषेध करण्यासाठी साताऱ्यातील मुस्लीम समाजातील अनेक तरुणांनी गुरुवार परज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी तरुणांनी ‘भारत माता की जय, जय हिंद, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा,’ अशा घोषणा दिल्या.
या मोर्चाचे नेतृत्व मुस्लीम अल्पसंख्यांक आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष फारुखभाई पटनी यांनी केले. यावेळी बोलताना पटनी म्हणाले, मुस्लीम तरुणांनी कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याला भीक घालू नये व वादग्रस्त विधानांवर विचार न करता भारत देशाच्या हितासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.’ असे आवाहन त्यांनी केले.
या मोर्चात आयेशा पटनी, यास्मिन इनामदार, रेखाताई तपासे, साईनाथ खंडागळे, महेंद्र गायकवाड, राजाभाऊ माने, सचिन वायदंडे, अक्षय कांबळे, शाकिब शेख, डॉम्नील डेव्हीड, प्रसाद पोळ, हसनभाई इनामदार, यश चव्हाण, आकाश वैराट, शैलेश बडेकर, आकाश आवळे, सागर यादव, शुभम भिसे, मंगेश जाधव, अमर सोनावणे, नागेश कांबळे, मिलिंद कांबळे, संदीप बडेकर, अरुण खंडागळे, अमर बोबाटे, अमित खुडे, विठ्ठल पवार
आदी नागरिक सहभागी झाले
होते. (प्रतिनिधी)