‘भागीरथी’ प्रकटणार एक तपानंतर !

By Admin | Updated: August 4, 2016 01:29 IST2016-08-04T00:19:59+5:302016-08-04T01:29:42+5:30

क्षेत्र महाबळेश्वर : गंगाभागीरथी प्रवाहातून जलस्त्रोत होणार सुरू; कन्यागत पर्वकाळ ११ आॅगस्टला

'Bhagirathi' will appear after one episode! | ‘भागीरथी’ प्रकटणार एक तपानंतर !

‘भागीरथी’ प्रकटणार एक तपानंतर !

अजित जाधव --महाबळेश्वर --क्षेत्र महाबळेश्वर येथील गंगाभागीरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे असते. त्यातून पाण्याचा एकही थेंब येत नाही. मात्र गुरू ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केला की अचानक गंगाभागीरथी प्रवाहातून जलस्त्रोत सुरू होतो आणि तो सतत वर्षभर सुरू राहतो. तब्बल बारा वर्षांनंतर ११ आॅगस्ट रोजी हा आगळा-वेगळा योग येत आहे. महाबळेश्वरातून उगम पावणाऱ्या सात नद्यांपैकी अकरा वर्षे कोरडी राहणारी गंगाभागीरथी नदी तब्बल एक तपानंतर प्रकट होणार आहे.
गुरू कन्या राशीतून बाहेर पडला आणि त्याने तूळ राशीमध्ये प्रवेश केला की पुन्हा गंगेचा प्रवाह कोरडे पडते. पुन्हा पुढची अकरा वर्षे ते पूर्णत: कोरडे राहते. बारा वर्षांनंतर गुरूने कन्या राशीमध्ये पुन्हा प्रवेश केला की गंगा कुंडातून जलप्रवाह सुरू
होतो.
कन्यागत महापर्वकाळामध्ये कृष्णेचे उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वरला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते, तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, कृष्णे काठावरील सर्व तीर्थक्षेत्रांना भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भाविक स्नानविधी, गंगा-पूजन, महापूजा, नैैवेद्य, व श्राद्धादी कर्मे करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. सर्व पितरांच्या उद्धाराबरोबरच ऐहिक व पारलौकिक सुखाचा लाभ पातकांचा नाश या महापर्वकाळात होतो, असे शास्त्रवचन आहे. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी साहजिकच भाविकांची गर्दी होणार आहे. हा महापर्वकाळात भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे.

गायत्री कुंडातून साठ वर्षांनंतर जलप्रवाह
या सात जलप्रवाहांची नावे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागिरथी आणि सरस्वती अशी आहेत. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडातून नित्य निरंतर जलप्रवाह सुरु असतो. सरस्वती नदी ही सदैव गुप्त रुपाने वास करुन असते. त्यामुळे तिच्यातील प्रवाह दिसत नाही. गायत्री कुंडातून साठ वर्षांतून एकदाच कपिलाषष्ठीच्या योगावर जलप्रवाह येतो. गायत्रीचे दर्शन एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदाच होऊ शकते.

काय आहे कन्यागत पर्वकाळ?
दक्षिण भारतातील एक प्राचीन सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे यंदाचे वर्षी शके १९३८ मधे श्रावण शु. ८ गुरुवार, दि. ११ आॅगस्ट २0१६ रोजी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी बारावर्षांतून गुरू कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. यावेळी भागीरथी नदी जलप्रवाह दृष्टिक्षेपास येणार आहे. गुरुकन्या राशीमध्ये असण्याच्या कालखंडाला कन्यागत पर्वकाळ असे म्हणतात.

Web Title: 'Bhagirathi' will appear after one episode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.