खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:15+5:302021-02-13T04:37:15+5:30
खासदार श्रीनिवास पाटील यांना त्यांची पत्नी रजनीदेवी पाटील यांनी सकाळी औक्षण केले. त्यानंतर प्रीतिसंगमावरील दिवंगत ...

खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खासदार श्रीनिवास पाटील यांना त्यांची पत्नी रजनीदेवी पाटील यांनी सकाळी औक्षण केले. त्यानंतर प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन खासदार पाटील यांनी घेतले. सकाळी दहापासून गोटे (कऱ्हाड) येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून मान्यवरांसह कार्यकर्ते व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दरम्यान, खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार गिरीष बापट, खासदार डॉ. अमोल कोल्हे, मंत्री धनंजय मुंडे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री शंभूराज देसाई, सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार मकरंद पाटील, खासदार सुनील तटकरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, आमदार ऋृतुराज पाटील, रूपालीताई चाकणकर, माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, आमदार महेश शिंदे, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शेखर निकम, आमदार सुनील टिंगरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, संजीवराजे नाईक-निंबाळकर, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, डीवायएसपी सुरज गुरव यांनी शुभेच्छा दिल्या.
पाटणचे नेते सत्यजीत पाटणकर, रवीराज देसाई, प्रभाकर देशमुख, डॉ. इंद्रजीत मोहिते, जसराज पाटील, अविनाश मोहिते, देवराज पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा उद्योग समूहाचे डॉ. सुरेश भोसले, मानसिंगराव जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष डॉ. प्रताप बाजीराव पाटील, पाटणचे सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, सनबीम शिक्षण समूहाचे अनिल गावंडे, प्रशांत लाड, दामोदर आरे, वि. तु. सुकरे गुरुजी, मारुती पाटील, वसंत माटेकर, जयवंत मोहिते, संजय पाटील, रघुनाथ जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ
१२श्रीनिवास पाटील
खासदार श्रीनिवास पाटील यांना कृष्णा उद्योग समूहाचे डाॅ. सुरेश भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.