शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिका : घंटागाड्या बंद.. कचरा घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 16:46 IST

Muncipal Corporation Satara : दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराकडून अदा करण्यात न आल्याने सातारा पालिकेच्या ३० घंटागाडीचालक व सहायकांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ३० टन कचरा हा घरातच पडून राहिला. जोपर्यंत वेतन अदा केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा घंटागाडी चालकांनी दिला आहे.

ठळक मुद्दे सातारा पालिका : घंटागाड्या बंद.. कचरा घरात!ठेकेदाराने वेतन रखडवल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

सातारा : दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराकडून अदा करण्यात न आल्याने सातारा पालिकेच्या ३० घंटागाडीचालक व सहायकांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ३० टन कचरा हा घरातच पडून राहिला. जोपर्यंत वेतन अदा केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा घंटागाडी चालकांनी दिला आहे.सातारा पालिकेने चाळीस घंटागाड्या खरेदी केल्या असून, त्या एका खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. ४० पैकी ३० घंटागाड्यांचा ठेका पुणे येथील एका खासगी कंपनीने घेतलेला आहे. प्रत्येक घंटागाडीवर चालक व सहायक असे दोन कर्मचारी काम करतात. चालकाला प्रतिमहा आठ तर सहायकाला सात हजार रुपये मानधन ठेकेदाराकडून दिले जाते.

संचारबंदी मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांची रोजीरोटी थांबली आहे. अशा परिस्थितीत ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे बिल अद्याप अदा केले नाही. वारंवार सांगूनही ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याचा आरोप करत घंटागाडी संघटनेने शुक्रवारी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला.साताऱ्यातील हुतात्मा स्मारक येथे सर्व घंटागाड्या लावण्यात आल्या. या आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित कंपनीचे व्यवस्थापक अभिजीत ढाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. येत्या काही दिवसात कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र कर्मचारी आपल्या मतावर ठाम होते.

जोपर्यंत दोन महिन्यांचे मानधन मिळत नाही तोपर्यंत घंटागाडी सुरु करणार नसल्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला. या आंदोलनाचा फटका कचरा संकलनाला बसला. घंटागाडीचा न आल्याने सुमारे ३०टन कचरा हा सातारकरांच्या घरातच पडून राहिला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान