छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : ‘वय हा फक्त आकडा असतो. त्यामुळे आयुष्याच्या उंबरठ्यावर असणारी माणसेही आपल्याला आनंद देतात. कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त असते. ज्येष्ठ साहित्यिकांनी या साहित्य संमेलनाला प्रेरणा दिली असून, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचे भाग्य मला लाभले आहे,’ असे विचार ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डाॅ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
सातारा शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अमेरिकेचे खासदार श्रीनिवास ठाणेदार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, सुनील खत्री, राजेंद्र राजपुरे, रामभाऊ लेंभे आदी उपस्थित होते.
विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘१९९३ मध्ये मंत्री अभयसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात साहित्य संमेलन घेतले होते. त्यानंतर ३२ वर्षांनी सातारा शहरात संमेलन होत आहे. स्वागताध्यक्ष असणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळे देशालाच या संमेलनाची भुरळ पडली आहे. या संमेलनात ८० वर्षांवरील साहित्यिकांचा सन्मान झाला आहे.’
या साहित्यिकांचा झाला सन्मान...या सोहळ्यात जयवंत गुजर, न. म. जोशी, डाॅ. नलिनी महाडिक, म. वि. कोल्हटकर, संभाजीराव पाटणे, रवींद्र बेडकिहाळ, सतीश कुलकर्णी, वि. ना. लांडगे, प्राचार्य रमणलाल शहा, पुरुषोत्तम शेठ, डाॅ. शरद अभ्यंकर, शैलजा दाते, ॲड. डी. व्ही. देशपांडे, डाॅ. दिलीप पटवर्धन, शाम भुरके, आदींचा सन्मान झाला.
Web Summary : Dr. Tara Bhavalkar emphasized that being active and creative is life's chronicle at the 98th Marathi Literary Conference. The event in Satara honored senior writers, with dignitaries like Shivendrasinhraje Bhosle and Srinivas Thanedar in attendance. The conference, returning to Satara after 32 years, also celebrated writers over 80.
Web Summary : डॉ. तारा भवाळकर ने 98वें मराठी साहित्य सम्मेलन में कहा कि सक्रिय और रचनात्मक होना ही जीवन का इतिहास है। सतारा में आयोजित इस कार्यक्रम में वरिष्ठ लेखकों को सम्मानित किया गया, जिसमें शिवेंद्रसिंहराजे भोसले और श्रीनिवास ठाणेदार जैसे गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। 32 वर्षों के बाद सतारा में लौटे इस सम्मेलन में 80 वर्ष से अधिक उम्र के लेखकों को भी सम्मानित किया गया।