शेताच्या वादावरून मारहाण; चार जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST2021-06-26T04:27:07+5:302021-06-26T04:27:07+5:30

शिरवळ : मिरजे ता. खंडाळा हद्दीमध्ये राहत्या घरासमोर शेतीच्या वादावरून चार जणांना दगड, काठी व हाताने मारहाण करीत जखमी ...

Beatings over farm disputes; Four people were arrested | शेताच्या वादावरून मारहाण; चार जणांना अटक

शेताच्या वादावरून मारहाण; चार जणांना अटक

शिरवळ : मिरजे ता. खंडाळा हद्दीमध्ये राहत्या घरासमोर शेतीच्या वादावरून चार जणांना दगड, काठी व हाताने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात महिलेसह चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील मिरजे याठिकाणी हेमंत मुकुंद कडाळे हे कुटुंबीयांसमवेत राहण्याकरिता आहे. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास हेमंत कडाळे हे कंपनीमधून घरी आले असता त्या ठिकाणी चुलत चुलते दत्तात्रय तुळशीराम कडाळे, दीपक दत्तात्रय कडाळे, लक्ष्मी दीपक कडाळे, आकाश दीपक कडाळे हे हेमंत कडाळे यांच्या घरासमोर येत हेमंत कडाळे यांना बाहेर बोलवून घेतले. संबंधितांनी हेमंत कडाळे यांना माळ नावाच्या शेतामध्ये फनपाळी का मारली अशी विचारणा केली. या वेळी हेमंत कडाळे यांनी संबंधित क्षेत्र हे आमच्या मालकीचे असल्याने फनपाळी मारल्याचे सांगताच संबंधितांनी हेमंत कडाळे यांच्यासह भाऊ भूषण कडाळे, वडील मुकुंद कडाळे, आई अनिता कडाळे यांना दगड, काठी व हाताने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी हेमंत कडाळे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय कडाळे, दीपक कडाळे, लक्ष्मी कडाळे, आकाश कडाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिरवळ पोलिसांनी संबंधितांना अटक केली आहे. खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे तपास करीत आहे.

Web Title: Beatings over farm disputes; Four people were arrested