घराच्या कारणावरून मारहाण; चौघांविरोधात गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:36 IST2021-05-01T04:36:55+5:302021-05-01T04:36:55+5:30

सातारा : घराच्या कारणावरून पती- पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्या प्रकरणात खेड (सातारा) येथील चौघांच्या विरोधात सातारा शहर ...

Beatings for home reasons; Crime record against four | घराच्या कारणावरून मारहाण; चौघांविरोधात गुन्हा नोंद

घराच्या कारणावरून मारहाण; चौघांविरोधात गुन्हा नोंद

सातारा : घराच्या कारणावरून पती- पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्या प्रकरणात खेड (सातारा) येथील चौघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणात विनयभंगाचाही गुन्हा दाखल आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सातारा तालुक्यातील खेड हद्दीत हा प्रकार झाला. घराला कुलूप लाऊन येथे राहायाचे नाही. हे घर माझे आहे, असे म्हणून एका संशयिताने शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यास फिर्यादी महिलेने विरोध केल्यावर शिवीगाळ, मारहाण करण्यात आली, तसेच फिर्यादी महिलेच्या पतीलाही मारहाण झाली. मारहाणीत काठीचा वापर करण्यात आला.

संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर रोहिदास शंकर सपकाळ, रवी रोहिदास सपकाळ, अनिरुद्ध रोहिदास सपकाळ आणि विजया रोहिदास सपकाळ (सर्व रा. खेड) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

......................................................

Web Title: Beatings for home reasons; Crime record against four