चार सेकंदही निघेना धीर...
By Admin | Updated: April 3, 2015 23:46 IST2015-04-03T22:37:44+5:302015-04-03T23:46:46+5:30
अतीघाईतील सातारकरांमुळे पाचदाऱ्यांना वेळच मिळत नाही.

चार सेकंदही निघेना धीर...
सिग्नल मिळण्यापूर्वीच वाहने सुसाट : पोवईनाक्यावरील बेशिस्त वाहतुकीमुळे पाचदारी त्रस्त; पोलिसांची केवळ बघ्यांची भूमिका
सातारा : पोवई नाका हे शहराचे नाक समजले जाते. याठिकाणी सात रस्ते एकत्र मिळतात. वाहतुकीत सुरळीतपणा आणण्यासाठी वाहतूक शाखेने पोवई नाका, जिल्हा परिषद चौकात सिग्नल यंत्रणा बसविली आहे. मात्र, सातारकरांना वाहतुकीचे नियम पाळणे अंगवळणी पडत नाही. हिरवा दिवा लागल्यामुळे सातारकर वाहने सुसाट दामटत आहेत. या चौकात पादचाऱ्यांसाठी पंधरा सेंकदांचा वेळ राखून ठेवला आहे. पण उतारावरुन ‘सिंग्नल’ मिळण्यापूर्वीच वाहने धावत असल्याने पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून रस्ता काढणे अवघड जात आहे. याठिकाणी पोलीसही असतात. मात्र, संबंधित वाहनापर्यंत पोहोचेपर्यंत वाहनचालकांनी पोवई नाका सोडलेला असतो. त्यामुळे अशावेळी पोलीसही काही करू शकत नाहीत.
पादचाऱ्यांची चिंता कोणाला? : अतीघाईतील सातारकरांमुळे पाचदाऱ्यांना वेळच मिळत नाही. त्यामुळे तेही त्यातूनच रस्ता काढतात.
नक्की कुणीकडे वाहतूक : चौकात एकावेळी एकाच दिशेला वाहतूक सुरू असते; पण पोलीस असतानाही दुचाकी आडवी मारत आहेत.
सिग्नलची चिंता कोणाला : लाल दिवा लागलेला दिसत असतानाही एकालाही थांबावे असे वाटत नाही, हे दुर्दैव.