शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Satara-ZP Election: सातारा ‘झेडपी’च्या ६५ गट अन् पंचायत समितींच्या १३० गणांसाठी रणसंग्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:19 IST

तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक; इच्छुक लागले तयारीला

सातारा : राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची निवडणूक जाहीर केली. यासाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्याही ६५ गट आणि ११ पंचायत समितीतील १३० गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर आता तब्बल नऊ वर्षांनी जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडणार असल्याने इच्छुकांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितींसाठी निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला. या पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्याचाही समावेश आहे. यामुळे मुदत संपल्यानंतर जवळपास पावणेचार वर्षांनी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात पुढील तीन आठवड्यांहून अधिक काळ राजकीय धुरळा उडणार आहे.तसेच, या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनानेही तयारी केलेली आहे. त्यानुसार आता प्रत्यक्षात १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असलेतरी या निवडणुकीत एकत्र येणार की स्वतंत्र लढणार हे येत्या काही दिवसांतच समोर येईल. तसेच, महाविकास आघाडीही एकत्रित निवडणूक लढविणार का, याची उत्सुकता आहे.

...म्हणून सातारा जिल्हा परिषदेची निवडणूकसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींची निवडणूक ही राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील आरक्षण मर्यादा ही ३८.४६ टक्के आहे. तसेच ११ पंचायत समितींमधीलही आरक्षण ५० टक्क्यांच्या आतच आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील निवडणूक होत आहे.

जिल्हा परिषदेतील ४० गट खुल्या प्रवर्गासाठी...जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी ७, जमाती प्रवर्ग एक आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी १७ असे एकूण २५ गट राखीव झालेले आहेत. तर सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी ४० गट आहेत.

पंचायत समितीत ४३ गण राखीव...जिल्ह्यातील ११ पंचायत समितींत एकूण १३० गण आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १३, ओबीसींसाठी ३० गण राखीव झाले आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकही गण आरक्षित नाही. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८७ गण आहेत.

तालुकानिहाय गट अन् गण संख्यामहाबळेश्वर - ०२ - ०४वाई - ०४ - ०८खंडाळा - ०३ - ०६फलटण - ०८ - १६माण - ०५ - १०खटाव - ०७ - १४कोरेगाव - ०६ - १२सातारा - ०८ - १६जावळी - ०३ - ०६पाटण - ०७ - १४कराड - १२ - २४

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Battle for 65 Groups, 130 Panchayat Samiti Seats

Web Summary : Satara Zilla Parishad elections announced after nine years; voting on February 5th. 65 ZP groups and 130 Panchayat Samiti seats will be contested. Nomination starts January 16th. Alliances' strategies awaited in this crucial rural election.