बनवडीची सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST2021-02-25T04:52:51+5:302021-02-25T04:52:51+5:30
बनवडीत सकाळी दहा वाजता निवडणूक कार्यक्रमास सुरुवात झाली. सरपंचपदासाठी प्रदीप पाटील आणि उपसरपंचपदासाठी विकास करांडे यांचा एकमेव अर्ज ...

बनवडीची सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध
बनवडीत सकाळी दहा वाजता निवडणूक कार्यक्रमास सुरुवात झाली. सरपंचपदासाठी प्रदीप पाटील आणि उपसरपंचपदासाठी विकास करांडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रदीप पाटील सरपंच आणि विकास करांडे यांची उपसरपंचपदावर बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट केले. नूतन सरपंच, उपसरपंचांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी केला.
यावेळी भाऊसाहेब घाडगे, हारुण नाईक, भिकू कोठावळे, जगन्नाथ कोठावळे, मारुती साठे, दिनकरराव करांडे, मिलिंद वाघमारे, संपतराव माळी, मिलिंद गायकवाड, बाळकृष्ण करांडे, विलासराव जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : २४केआरडी०२
कॅप्शन : बनवडी, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रदीप पाटील व उपसरपंचपदी विकास करांडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.