शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोयनेसह बलकवडी, मोरणा धरणातून विसर्ग, पावसाची संततधार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:28 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कायम असून, आता कोयना धरणासह बलकवडी आणि मोरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ९५४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पाटण तालुक्यात घरांची पडझड सुरू झाली आहे.

ठळक मुद्देकोयनेसह बलकवडी, मोरणा धरणातून विसर्ग, पावसाची संततधार कायम घरांची पडझड सुरू; धरणसाठा झपाट्याने वाढू लागला

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कायम असून, आता कोयना धरणासह बलकवडी आणि मोरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ९५४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पाटण तालुक्यात घरांची पडझड सुरू झाली आहे.गेल्या १८ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ७९.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

यंदा गतवर्षीपेक्षा लवकरच धरण भरणार आहे. तर मंगळवारपासून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पायथा वीजगृह आणि दरवाजातून पाणी सोडण्यात आले आहे. तर बुधवारी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.

पायथा गृहातून २१०० आणि दरवाजातून ७४४१ असा ९५४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर बलकवडी धरणातूनही पाणी सोडण्यात आले आहे. १४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मोरणा धरणातूनही ३५१० क्युसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. बलकवडी येथे ८३, उरमोडी ६२ आणि तारळी धरण परिसरात १०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धोम धरणात ८.२८ टीएमसी, कण्हेर ७.५७, बलकवडी ३.५६, उरमोडी ७.२२ तर तारळी धरणात ४.७१ टीमएसी इतका साठा झाला आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम १४ (४५२)कोयना १३५ (२९२४)बलकवडी ८३ (१५६३)कण्हेर ३१ (५१६)उरमोडी ६२ (७३९)तारळी १०२ (१३७६)साताऱ्यात ऊन पावसाचा खेळ...सातारा शहर आणि परिसरात गेल्या १७ दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. बुधवारी सकाळी पावसाने काहीकाळ उघडीप दिली होती. त्यामुळे ऊन पडले होते. त्यानंतर पाऊस पडू लागला.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरRainपाऊस