पालिकेचा लेखापाल जाळ््यात

By Admin | Updated: August 27, 2014 23:20 IST2014-08-27T22:50:12+5:302014-08-27T23:20:53+5:30

'लाचलुचपत'ची कारवाई : चौदा हजार रुपयाची घेतली लाच

The bank accountant burns | पालिकेचा लेखापाल जाळ््यात

पालिकेचा लेखापाल जाळ््यात

सातारा : वेतनश्रेणी फरकाची बिले काढण्यासाठी १४ हजारांची लाच घेताना सातारा पालिकेचा लेखापाल आनंदराव गोविंंदराव नवाळे (वय ५५, रा. गुरुवार पेठ, सातारा) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवारी) दुपारी येथील मोती चौकात करण्यात आली.
शहरातील एकूण १४ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीच्या फरकाची बिले काढायची होती. त्यामुळे सर्व शिक्षक पालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये लेखापाल असलेल्या नवाळेकडे गेले. त्यावेळी नवाळेने प्रत्येकी दोन ते चार हजार असे एकूण
२८ हजारांची मागणी शिक्षकांकडे केली. दरम्यान, या प्रकाराची तक्रार शिक्षकांनी दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागाकडे केली होती. आज दुपारी मोती चौकातील एका हॉटेलमध्ये नवाळेने पैसे घेऊन शिक्षकांना बोलावले होते. त्यापैकी एका शिक्षकाकडून १४ हजार रुपये लाच घेताना नवाळेला हॉटेलमध्येच रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे मोती चौकात खळबळ उडाली. या कारवाईनंतर नवाळेच्या घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कुरळे यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी) / संबंधित बातमी हॅलो तीनवर...

Web Title: The bank accountant burns