शिल्लक निधी वळवण्याचा घाट
By Admin | Updated: June 20, 2014 23:06 IST2014-06-20T23:04:16+5:302014-06-20T23:06:03+5:30
मेगा पाणलोट प्रकल्प : पाटण तालुक्यात समित्या अंधारात

शिल्लक निधी वळवण्याचा घाट
पाटण : कृषी विभागाच्या ‘मेगा पाणलोट’ प्रकल्पातील प्रेरक प्रवेश उपक्रमाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर असतानाच आता पाणलोट समित्यांना अंधारात ठेवून शिल्लक निधी परस्पर इतर ठिकाणी वळवण्याचा ‘घाट’ अधिकाऱ्यांनी घोतला आहे. त्यामुळे ‘तेल ही गेले आणि तुपही गेल’े असे म्हणण्याची वेळ पाटणलोट समित्यांवर आली आहे.
‘मेगा पाटणलोट’ प्रकल्पातील ‘प्रेरक प्रवेश’ उपक्रमातील साहित्य खेरदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पाणलोट समित्यांच्या आधारे केला आहे. मात्र उपक्रमातील साहित्य खरेदी करुन उर्वरीत रक्कम पाणलोट समिती व ग्रामसभा ठरावानुसार खर्च करण्यात यावी, अशी मागणी केली असताना शिल्लक रक्कम नैसर्गिक साधन संपत्तीवर खर्च करण्याचा प्रयत्न कृषी अधिकाऱ्यांनी सुरु केला आहे. त्यामुळे पाणलोट समितींच्या अधिकारावरच यामुळे गंडांतर येणार असल्याचे बोललं जात आहे.
तालुक्यातील चौवीस गावांचा समावेश प्रकल्पामध्ये करण्यात आला होता. प्रकल्पाच्या चार टक्के रक्कम या उपक्रमावर खर्च करण्यात आली होती. त्यानुसार ५५ लाख ६७ हजार एवढा निधी या गावांना मिळाला होता. निधी खर्च करण्याचे अधिकार पाणलोट समित्यांना देण्यात आले होते. मात्र समित्यांना अंधारात ठेवून चौवीस गावातील सुमारे ४३ लाख ४९ हजार निधी परस्पर खर्च केला आहे. मागणी नसताना उपक्रमातील साहित्य समित्यांच्या माथी मारले आहे. शासनाचे मार्गदर्शक तत्वे गुंडाळून समित्यांना माहिती न देता निधीची विल्हेवाट लावली आहे.
शिल्लक निधी सुमारे १२ लाख १८ हजार एवढा असून शिल्लक निधी तरी ग्रामसभांच्या मागणीनुसार खर्च करण्यात यावा. मात्र, कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी हा निधी नैसर्गिक साधन संपत्तीवर खर्च करण्याचे म्हटले आहे. निधी खर्च करण्याचे अधिकार ग्रामसभांना असतात इतर ठिकाणी निधी वळविण्याचा अधिकार संबंधितांना दिला कोणी हे समजत नाही. (वार्ताहर)