बहिण-भावाचे प्रेम आता आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:32 IST2017-07-31T15:32:10+5:302017-07-31T15:32:16+5:30

सातारा : शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असणाºया बहीण भावांचा सण यंदा आॅनलाईन साजरा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गत काही वर्षांच्या तुलनेत यंदा टपाल आणि कुरिअरच्या माध्यमातून राखी पाठविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे वास्तव पुढे येत आहे.

bahaina-bhaavaacae-paraema-ataa-aennalaaina | बहिण-भावाचे प्रेम आता आॅनलाईन

बहिण-भावाचे प्रेम आता आॅनलाईन

ठळक मुद्दे परस्परांना व्हिडिओ कॉल करून होणार रक्षाबंधन साजरा

सातारा : शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असणाºया बहीण भावांचा सण यंदा आॅनलाईन साजरा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गत काही वर्षांच्या तुलनेत यंदा टपाल आणि कुरिअरच्या माध्यमातून राखी पाठविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे वास्तव पुढे येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रक्षाबंधन सणाच्या आधी सुमारे महिनाभर आपल्यापासून दूर असणाºया भावाला राखी पाठविण्यासाठी बहिणींची लगबग असायची. स्पीडपोस्ट व कुरिअरच्या कार्यालयांमध्ये या टपालांची रीघ असायची. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण कमी झाल्याचे कुरिअर व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, सध्या व्हिडिओ कॉलिंगची सोय सर्वांकडेच उपलब्ध झाली आहे. सणाच्या धामधुमीत राखी पोहोचतेय का? सणाच्या आदल्यादिवशी भावाला मिळेल का? मिळाली तरी तो रुमवर ती कोणाकडून बांधून घेणार अशा अनेक प्रश्नांचे फेरे बहिणींच्या डोक्यात सुरू असायचे. यावर उतारा म्हणून बहिणी स्मार्ट झाल्या असल्याचे बाजारपेठेत चित्र दिसत आहे.

.........

गिफ्टही आॅनलाईनच!

नोटाबंदीनंतर अनेक पैसे हस्तांतरित करण्यासाठी अनेक आॅनलाईन अ‍ॅप दाखल झाले. या अ‍ॅपचा वापर करून बहीण भावाला पैसे पाठवून त्यातून स्वत:च्या पसंतीची राखी घेण्याचे सांगत आहे. तर तिकडून भाऊही ओवाळणी म्हणून आॅनलाईन पैसे पाठवून आवडीचे गिफ्ट घेण्याचे सांगत आहे.

दिवसभर घराला कुलूप

मोठ्या शहरात शिक्षण आणि नोकरीच्यानिमित्ताने घराबाहेर असणाºया भावाला टपालाने पाठवलेली राखी त्याला मिळेलच याची शाश्वती नसते. घरात कोणी नसेल तर शेजाºयांकडे कुरिअर ठेव, असे सांगण्याची प्रथा महानगरांमध्ये नाही. त्यामुळे कित्येकदा राखी वेळे आधी पाठवूनही ती भावापर्यंत पोहोचत नाही. आणि अगदीच राखी भावापर्यंत पोहोचली तर ती बांधणार कोण? असा प्रश्न बहिणींपुढे असतो. दिवसभर घराला कुलूप असल्यामुळे पोस्टाने राखी पोहोचणं मुश्कील होते.

Web Title: bahaina-bhaavaacae-paraema-ataa-aennalaaina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.