शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'बाबा...तुम्ही विधानसभा लढवावी, चंद्रकांत दादांची कृपा अन् मुख्यमंत्र्यांची मेहरबानी नको'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 16:18 IST

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक देखील 21 आँक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.

मुंबई - साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक देखील 21 आँक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. उदयनराजेंविरोधात काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण निवडणुक लढणवणार अशा गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांची मुलगी अंकिता खोत यांनी बाबांनी विधानसभा निवडणुक लढवावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (रविवारी) आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिक्षा बोलत होत्या.

कराडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळ्यावत पृथ्वीराज चव्हाण यांची मुलगी अंकिता खोत यांनी सांगितले की, सध्या विधानसभा की लोकसभा बाबा कोणती निवडणुक लढवणार याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. परंतु बाबांनी कराड विधानसभेचीच निवडणुक लढवावी अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी बोलवून दाखविले आहे. त्याचप्रमाणे विरोधक म्हणतात पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईमध्ये असण्याची गरज नाही आहे. परंतु चंद्रकांत दादांची कृपा आणि मुख्यमंत्र्यांची मेहरबानी कराडवर आम्हाला नको आहे. त्यामुळे कराडमधला आमचा आमदार मुंबईला असणं गरज असल्याचे देखील अंकिता खोत यांनी ठणकावून सांगितले. त्याचप्रमाणे कराडला MH 50 हे खूप मोठं गिफ्ट दिल्याचं देखील त्यांनी सांगितले.

साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंसमोर कडवे आव्हान उभे करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यासाठी साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडून तेथून पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. यासाठी कराडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलीसह सर्व कार्यकर्त्यांकडून देखील विधानसभा निवडणुक लढा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण नेमकं कुणाचं ऐकणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील