अस्ताव्यस्त पार्किंग; पादचारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:45+5:302021-02-13T04:38:45+5:30

पादचारी त्रस्त कऱ्हाड : शहरातील दत्त चौक, भेदा चौक व बसस्थानक परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे पादचारी तसेच शालेय व महाविद्यालयीन ...

Awkward parking; Pedestrian distressed | अस्ताव्यस्त पार्किंग; पादचारी त्रस्त

अस्ताव्यस्त पार्किंग; पादचारी त्रस्त

पादचारी त्रस्त

कऱ्हाड : शहरातील दत्त चौक, भेदा चौक व बसस्थानक परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे पादचारी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनधारक रस्त्याकडेला वाहने पार्क करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

धोम जलाशयात

हुल्लडबाजी

वाई : निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेल्या वाई तालुक्यातील धोम व बलकवडी धरणांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. अनेक पर्यटक येथील सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक पाण्यात पोहण्याचा, दगडावर उभे राहून सेल्फी काढत आहे. धोका पत्करून सुरू असलेली ही स्टंटबाजी रोखणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने पर्यटकांच्या हुल्लडबाजीवर कोणाचेही नियंत्रण नाही.

Web Title: Awkward parking; Pedestrian distressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.