चित्र फलकांमधून वन्यप्राण्यांबाबत जनजागृती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 01:12 AM2020-01-19T01:12:35+5:302020-01-19T01:13:44+5:30

सागर चव्हाण । पेट्री : साताऱ्यातील बोगदा ते बामणोली मार्गावर सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांच्या मार्फत रस्त्याकडेला विविध प्राणी ...

 Awareness about wildlife through the picture pane .. | चित्र फलकांमधून वन्यप्राण्यांबाबत जनजागृती..

सातारा-बामणोली मार्गावर अशाप्रमाणे प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्देसातारा-बामणोली रस्ता । निसर्ग संरक्षण, वन्यजिवांच्या संरक्षणासाठी प्रबोधन

सागर चव्हाण ।
पेट्री : साताऱ्यातील बोगदा ते बामणोली मार्गावर सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांच्या मार्फत रस्त्याकडेला विविध प्राणी व पक्ष्यांचे सचित्र तसेच उद्बोधनपर घोषवाक्ये असलेले सुामरे ६५ माहिती फलक उभारले आहेत. याद्वारे पर्यावरणाचे संतुलन, निसर्गाचे संरक्षण, संर्वधन तसेच वन्यजिवांच्या संरक्षणासाठी जनजागृती केली जात आहे. परिसरात पर्यटनास येणाºया पर्यटकांचे प्रबोधन करण्यास या फलकाची मदत होते.

काससह बामणोली, तापोळा भागात पर्यटनास येणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिसरात पर्यटक वर्षभर फिरायला येतात. फुलांच्या हंगामात तर लाखोंच्या संख्येने पर्यटक या परिसराला भेट देत असतात. किल्ले वासोट्याकडे जाणाºया पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. दरम्यान, पर्यावरणाचे रक्षण, वन्यजीवांच्या रक्षणासाठी परिसरात पर्यटनास येणाऱ्यांमध्ये उद्बोधन व्हावे, यासाठी सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर स्टिथ कºहाड यांच्यामार्फत सातारा (बोगदा) ते बामणोली या मार्गावर रस्त्याकडेने विविध वन्य पशुपक्षी तसेच ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जलप्रदूषणासह पर्यटकांकडून होणा-या प्लास्टिक घनकचºयावर मार्मिक टिप्पणी करणाºया छायाचित्रांचे साधारण ६५ माहिती फलक उभारण्यात आले आहेत.

दरवर्षी शहराच्या पश्चिमेस विघ्नसंतुष्टांकडून मोठ्या प्रमाणावर वणवा लावला जातो. त्यामध्ये शेकडो टन चाºयासह कित्येक झाडे होरपळून मुक्या जीवांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. विघ्नसंतुष्टाकडून वणवा लावला जाऊ नये तसेच या विकृत प्रवृत्तीची मानसिकता बदलण्यासाठी या माहिती फलकांचा उपयोग होण्यास मदत होत आहे.

कास, शेंबडीमठ, वासोटा (व्याघ्रगड ), चकदेव, उत्तरेश्वर, आरवचे देवराई पर्वत, महिमानगड असे बामणोली वन्यजीव वनक्षेत्रात पर्यटनाचे विविध ठिकाणे आहेत. या पर्यटनाच्या ठिकाणांना पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. त्यांच्यात पर्यावरण संतुलन तसेच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी छायाचित्रांसह उभारण्यात आलेल्या माहिती फलकांद्वारे जनजागृती होण्यास मदत होत आहे.

कोणत्याही अपप्रवृत्तीमुळे प्राण्यांना इजा पोहोचणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणाने वन्यजीवांच्या अधिवासात बदल होणार नाही, यासाठी विवेकपूर्ण जाणीवपूर्वक आपल्या निसर्गाची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

 

 

  • .... जंगलात फिरण्याचा माझा हक्का!

‘नो हॉर्न, वाईल्ड लाईफ क्रॉसिंग झोन’, ‘ड्राईव्ह स्लोली,’ ‘अतिथी देवो भव:’ ‘देव कचरा करत नाही’, ‘नियमाला देऊ जोड शिस्तीची’, ‘पवित्र ठिकाणी योग्य कृतीची ( स्वच्छता राखा)’, ‘जंगल क्षेत्रात घाण करू नका’, ‘आम्हालाही आहे जगण्याचा अधिकार’, ‘जंगलात फिरण्याचा माझा हक्क’, ‘भरधाव गाडी चालवण्याचा नका करू हट्ट’, ‘सुरेख हे पक्षी निसर्ग रक्षी’ आदी उद्बोधनपर घोषवाक्ये फलकावर लिहिली आहेत.

 

  • यांनाही जगण्याचा अधिकार

सातारा-बामणोली मार्गावर उभारण्यात आलेल्या विविध प्राणी पक्षी यांच्या सचित्र माहिती फलकांद्वारे पर्यावरण, निसर्गाचे संरक्षण व संवर्धन तसेच वन्यजीवांचे रक्षण होण्यासाठी जनजागृती होण्यास मदत आहे. तसेच जसा मानवाला जगण्याचा अधिकार आहे, तसा मुक्या वन्यजीवांनाही जगण्याचा अधिकार आहे. यामुळे या माहिती फलकाद्वारे प्रबोधन होण्यास मदत होणार आहे,’ असा विश्वास बामणोलीच्या वन्यजीव विभागाचे वनपाल सागर कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

 

सातारा-बामणोली मार्गावर उभारलेल्या सचित्र माहिती फलक पर्यटक तसेच वाहनचालक वाहने चालविताना सतत नजरेस येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून निसर्ग, वन्यजीवांचे तसेच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत होत आहे.
- हेमंत साळुंखे, पर्यावरणप्रेमी सातारा

 

Web Title:  Awareness about wildlife through the picture pane ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.