‘पुरस्कृत उंडाळकर’ राष्ट्रवादीच्या अपचनी!

By Admin | Updated: September 28, 2014 00:34 IST2014-09-28T00:29:23+5:302014-09-28T00:34:13+5:30

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ : रामराजे, शिंदे, उदयनराजे यांची जिल्हा बँकेत खलबते

'Awarded Inderkar!' | ‘पुरस्कृत उंडाळकर’ राष्ट्रवादीच्या अपचनी!

‘पुरस्कृत उंडाळकर’ राष्ट्रवादीच्या अपचनी!

सातारा / कऱ्हाड : राष्ट्रवादीने ऐनवेळी ‘कऱ्हाड दक्षिण’मधून आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांना राष्ट्रवादी ‘पुरस्कृत’ करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र कार्यकर्त्यांच्या दबावापुढे राष्ट्रवादीला झुकावे लागले परिणामी काकांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्र्णय घेतला. राष्ट्रवादीने राजेंद्र यादव यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले अन् अर्ज दाखल करतानाच ‘एबी’ फॉर्मही देऊन टाकला.
‘कऱ्हाड दक्षिण’मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पत्ता कट झाला. परिणामी ते अपक्ष, राष्ट्रवादी पुरस्कृत अथवा राष्ट्रवादी यापैकी एक पर्याय निवडतील, अशी शक्यता निर्माण झाली.
शुक्रवार, दि. २६ रोजी दिवसभरात या चर्चांना मोठा ऊत आला. राष्ट्रवादीची नेतेमंडळी काकांनी ‘राष्ट्रवादी पुरस्कृत’ म्हणून लढावे, यासाठी आग्रही होती. मात्र, काकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा त्यांना तत्काळ ‘एबी’ फॉर्म देण्यात येईल, असे सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुम्हाला पुरस्कृत करणार नाही, असा निरोपही रामराजे नाईक-निंबाळकरांकडून देण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हा बँकेत रामराजे, शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांची बैठक सुरू झाली. तिघांमध्ये खलबते होऊनही निर्णय होऊ शकला नाही. ‘पुरस्कृत’ होण्यास नकार दिल्यामुळे अखेर विलासराव पाटील-उंडाळकरांपुढे अपक्ष म्हणून लढण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र, उदयनराजेंनी यादवासाठी आग्रह धरला आणि त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. (प्रतिनिधी)
 

Web Title: 'Awarded Inderkar!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.