शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आनेवाडी टोलनाका पाडला बंद, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:54 PM

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आनेवाडी टोलनाका बंद पाडून निदर्शने केली. तसेच यावेळी टोल वसुलीही बंद पाडली.

ठळक मुद्देआनेवाडी टोलनाका पाडला बंद, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार निदर्शने करत वसुलीही केली बंद; महामार्गाच्या दुरवस्थेचे कारण

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आनेवाडी टोलनाका बंद पाडून निदर्शने केली. तसेच यावेळी टोल वसुलीही बंद पाडली.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था आणि त्यातून प्रवास करताना प्रवाशांचे होणारे हाल याविषयी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी विविध स्तरावर पत्रव्यवहार केला होता.

तसेच भेटी घेऊन प्रशासनाकडे दादही मागितली होती. तर गत महिन्यात याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी वेळ मागून घेतली होती. तरीही निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात अपयश आल्याने हे आंदोलन करण्यात आले.बुधवारी सकाळी साडेअकराला आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत टोलनाक्यावरील वसुली बंद केली. यावेळी सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, अविनाश कदम, अमोल मोहिते, कांचन साळुंखे, फिरोज पठाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :tollplazaटोलनाकाSatara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले