औंधच्या एटीएममध्ये कायमच खडखडाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:15 IST2019-06-19T16:14:34+5:302019-06-19T16:15:34+5:30
औंध येथील कोणत्याही एटीएम सेंटरमधून व्यवस्थित पैसे निघत नसल्याने परिसरातील ग्रामस्थ, भाविक व पर्यटकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एटीएम प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, येथील दोन्ही एटीएम केंद्रे शोपीस बनल्या असून, ते असून अडचण व नसून खोळंबा बनली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

औंधच्या एटीएममध्ये कायमच खडखडाट!
औंध : औंध येथील कोणत्याही एटीएम सेंटरमधून व्यवस्थित पैसे निघत नसल्याने परिसरातील ग्रामस्थ, भाविक व पर्यटकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एटीएम प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, येथील दोन्ही एटीएम केंद्रे शोपीस बनल्या असून, ते असून अडचण व नसून खोळंबा बनली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
औंध परिसरातील दहा ते पंधरा गावांमधील नागरिक, ग्राहक, शेतकरी वर्गाचा नियमित वेगवेगळ्या कारणांनी संबंध येतो. यामध्ये बँका, बाजारपेठेशी आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक तसेच दळणवळणदृष्ट्या ही महत्त्वाचे नियमित औंधशी संबंध येतो.
औंधमध्ये दोन राष्ट्रीयकृत बँका व एक जिल्हा बँक आहे. येथील पर्यटक, भाविक, ग्रामस्थांना केव्हाही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा मोठा आधार होता. मात्र, बेजबाबदार सेवामुळे ही एटीएम केंद्रे शोपीस बनली आहेत.