शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

Satara: भरदिवसा घरातून युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न, एकाला पकडले; कऱ्हाड तालुक्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 13:38 IST

लग्नाला माझा व माझ्या आई- वडिलांचा विरोध असून, हे लग्न होऊ शकत नाही, असे युवतीने त्याला सांगितले. यानंतर युवतीने संपर्क तोडला.

कऱ्हाड : भरदुपारी घरात झोपलेल्या युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. यावेळी प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी अपहरण करणाऱ्यांचा पाठलाग करून एकाला पकडले, तर त्याचे साथीदार कार, तसेच दुचाकीवरून पसार झाले. कऱ्हाड दक्षिण विभागातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी नऊ जणांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील नारायण पवार (ता. वाळवा, जि. सांगली), माणिक निवृत्ती लाड (रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यासह अन्य सात जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड दक्षिण विभागातील एका गावातील युवती २०१६ मध्ये नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहत होती. त्यावेळी सुनील पवार याचे तिच्या घरी येणे- जाणे होते. त्यातूनच सुनील पवार याने त्या युवतीला लग्नाची मागणी घालून मला तू आवडतेस, असे सांगितले होते.मात्र, ही बाब समजल्यानंतर युवतीच्या पालकांनी तिला गावी आणले. त्यानंतर सुनील पवार याने वारंवार युवतीशी संपर्क साधला. मात्र, लग्नाला माझा व माझ्या आई- वडिलांचा विरोध असून, हे लग्न होऊ शकत नाही, असे युवतीने त्याला सांगितले. एप्रिल २०२३ नंतर युवतीने सुनीलशी असलेला संपर्क तोडला.दरम्यान, शनिवारी दुपारी जेवण केल्यानंतर पीडित युवती त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या आजीच्या घरी झोपण्यासाठी गेली होती. त्यावेळी अचानक सात ते आठ जण घरात घुसले. त्यांनी त्या युवतीला जबरदस्तीने ओढत घराबाहेर आणले. कारमध्ये घालून त्यांनी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनील पवार याला युवतीने ओळखले. तिने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी जमले. त्यांनी पाठलाग करून युवतीची सुटका केली, तसेच माणिक लाड या संशयिताला जागीच पकडले.मात्र, इतर सात ते आठ जण कारमधून, तसेच दुचाकीवरून पळून गेले. याबाबत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अर्चना शिंदे तपास करीत आहेत.आजच लग्न करू, मी तयारीसह आलोय...युवतीचे अपहरण करीत असताना पीडित युवतीने सुनील पवार याला ओळखले. त्यावेळी तिने सुनीलला मला कुठे घेऊन निघालाय, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने आपण आजच्या आजच लग्न करू. मी तयारीनीशी आलोय, असे म्हणत युवतीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. मात्र, तिने आरडाओरडा केल्यामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी