खंडाळ्यात आमदार मकरंद पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न, मराठा बांधव आक्रमक 

By दीपक शिंदे | Published: October 30, 2023 06:13 PM2023-10-30T18:13:55+5:302023-10-30T18:14:19+5:30

खंडाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खंडाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात ...

Attempt to block MLA Makarand Patil's car in Khandala, Maratha society aggressive | खंडाळ्यात आमदार मकरंद पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न, मराठा बांधव आक्रमक 

खंडाळ्यात आमदार मकरंद पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न, मराठा बांधव आक्रमक 

खंडाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खंडाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. मात्र, या उपोषणास भेट न देता आमदार मकरंद पाटील हे साखर कारखान्याच्या कार्यक्रमास गेले. यामुळे आक्रमक क्रांती मोर्चाच्या समाजबांधवांनी कारखाना स्थळावर आमदारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करून निषेध व्यक्त केला. त्यामुळे आरक्षण मुद्द्यावरून मराठा बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आले.

खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम कारखाना स्थळावर घेण्यात आला होता. यावेळी काही आक्रमक मराठा समाजबांधवांनी प्रवेशद्वाराजवळच ‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणाबाजी करीत आमदार मकरंद पाटील यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निषेधही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना रोखले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

कार्यक्रम संपल्यानंतर मात्र आमदार मकरंद पाटील यांनी प्रमुख नेतेमंडळींसोबत उपोषणस्थळास भेट देऊन मराठा समाजबांधवांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचे स्पष्ट करीत वाढदिवसाचे फलकही काढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले.

आमदार मकरंद पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, आजची त्यांची कृती खेदजनक वाटते. मराठा बांधवांना भेटण्यापेक्षा कारखान्यात मोळी टाकणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. वास्तविक, त्यांनी मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेऊन विधानसभेत आवाज उठविणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याकडून असे घडताना दिसत नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. - युवराज ढमाळ, मराठा क्रांती मोर्चा

Web Title: Attempt to block MLA Makarand Patil's car in Khandala, Maratha society aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.