जमिनीच्या वादातून काठ्या, कुऱ्हाडीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:44 IST2021-09-21T04:44:47+5:302021-09-21T04:44:47+5:30

सातारा : तासगाव, ता. सातारा येथे जमिनीच्या वादातून एका कुटुंबातील आठ जणांना काठ्या-कुऱ्हाडी व कुकुरीने मारहाण केल्याप्रकरणी नऊ जणांवर ...

Attack with sticks, ax from land dispute | जमिनीच्या वादातून काठ्या, कुऱ्हाडीने हल्ला

जमिनीच्या वादातून काठ्या, कुऱ्हाडीने हल्ला

सातारा : तासगाव, ता. सातारा येथे जमिनीच्या वादातून एका कुटुंबातील आठ जणांना काठ्या-कुऱ्हाडी व कुकुरीने मारहाण केल्याप्रकरणी नऊ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संभाजी बाळकृष्ण शिरतोडे, तानाजी बाळकृष्ण शिरतोडे, शिवाजी बाळकृष्ण शिरतोडे, विशाल बजरंग शिरतोडे, वैभव बजरंग शिरतोडे, उज्ज्वला शिवाजी शिरतोडे, गौरी तानाजी शिरतोडे, (सर्व रा. तासगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.

याबाबत राजेंद्र निवृत्ती शिरतोडे (रा. तासगाव, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. वरील संशयितांनी मला, पत्नी उषा, मुलगा गजानन व कमलाकर, भाऊ उमेश, त्याची पत्नी रेखा तसेच पुतण्या गणेश व अविनाश यांना काठ्या-कुऱ्हाडीने मारहाण केल्याचे राजेंद्र यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार सावंत हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Attack with sticks, ax from land dispute