शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Satara: खंडणीसाठी भाईगिरी, भाजी विक्रेत्यावर कोयत्याने वार; कऱ्हाडातील घटना 

By संजय पाटील | Updated: January 5, 2024 19:06 IST

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड : आम्ही या एरीयाचे भाई आहे, असे म्हणत भाजी विक्रेत्यांना चाकू व कोयत्याचा धाक दाखवून भरदिवसा खंडणी मागण्यात आली. तसेच हप्ता द्यायला नकार दिल्याने युवकावर वार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोहीत रमेश कारंडे (रा. चांभारगल्ली, गुरूवार पेठ, कऱ्हाड), श्रीधर थोरवडे, बाळू कुर्ले (रा. कऱ्हाड) यांच्यासह अन्य एका अनोळखीचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत श्रीकांत सुर्यकांत शिंदे यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूवार पेठेत राहणारे श्रीकांत शिंदे हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते गुरूवार पेठेत भाजी विक्री करीत असताना रोहीत कारंडे याच्यासह त्याचे अन्य साथीदार त्याठिकाणी आले. आम्ही या एरीयाचे भाई आहोत. आम्हाला हप्ता द्यावा लागेल, असे म्हणून त्यांनी श्रीकांत शिंदे यांना दमदाटी केली. श्रीकांत यांनी त्यांना हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी कोयता व चाकूने त्यांच्यावर वार केला. मात्र, श्रीकांत यांनी तो वार चुकवला. त्यावेळी इतर भाजी विक्रेते भीतीने भाजीपाला जागेवरच सोडून पळून गेले.चाकू व कोयत्याचा धाक दाखवत आरोपींनी श्रीकांत शिंदे यांच्या खिशातील साडेआठशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच इतर विक्रेत्यांनाही हप्ता देण्यासाठी धमकावले. याबाबत श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस