अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 00:44 IST2015-09-15T00:44:07+5:302015-09-15T00:44:24+5:30

आश्रमशाळेतील प्रकार : आणखी एकावर गुन्हा

Atrocities against minor girls; One arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

दहिवडी : माण तालुक्यातील एका आश्रमशाळेतील मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शहाजी पाटोळे याला अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेची माहिती दडविल्याप्रकरणी बाळासाहेब ऊर्फ सूर्यकांत यशवंत माने याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
११ सप्टेंबरला दुपारी आश्रमशाळेतील मुलगी खोलीत बसली असताना तिला स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर शहाजी पाटोळे याने अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याचीही धमकी दिली होती. त्यानंतर संबंधित मुलीने मावशीला हा प्रकार सांगितला. त्यावरून मावशीने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी कलम ३७६,
बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा, तसेच अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही माहिती दडविल्याप्रकरणी माने याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Atrocities against minor girls; One arrested