शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: तलवार अन् कुऱ्हाडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस चोरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 12:39 IST

सातारा : कारखान्यात ऊस ताेडून नेत असताना तलवार, कुऱ्हाडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेला. ही घटना १२ ...

सातारा : कारखान्यात ऊस ताेडून नेत असताना तलवार, कुऱ्हाडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेला. ही घटना १२ डिसेंबर २०२३ रोजी घडली असून, याची तक्रार न्यायालयाच्या आदेशानुसार दि. ९ मार्च रोजी रात्री आठ वाजता बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बबन राजाराम पवार (वय ७२), महादेव राजाराम पवार ( ७०), नंदा महादेव पवार (वय ६०), सुशांत मनोहर पवार (वय ३२), धोंडीराम राजाराम पवार (वय ६५), भरत महादेव पवार (वय २६), दत्तात्रय बबन पवार (वय ३५), सूरज शितोळे (वय २९, सर्व रा. आंबेवाडी, पो. माजगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वनिता मनोहर यादव (वय ५७, रा. आंबेवाडी, पो. माजगाव, ता. सातारा) यांच्या शेतातील ऊस कामगारांमार्फत तोडून कारखान्यात नेला जात होता. १२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी अडीच वाजता वरील संशयितांनी हातात तलवार, कुऱ्हाड, लाकडी दांडके घेऊन ‘आडवा आला तर तुकडे करून टाकू,’ अशी ऊसतोड कामगारांना धमकी दिली. त्यानंतर तोडलेला ऊस ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये भरून जबरदस्तीने चोरून नेला.याबाबत फिर्यादी वनिता यादव यांनी न्यायालयात फाैजदारी खटला दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार वरील संशयितांवर शनिवार, दि. ९ रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsugarcaneऊस