सातारा: सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत (रा.लिंब ता. सातारा) यांच्यावर काल, रविवार (दि.१) रात्री प्राणघातक हल्ला झाला. युवकांच्या टोळक्याने धारदार कोयत्यासारख्या शस्त्राने सावंत यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे. जितेंद्र सावंत यांच्यावर मानेवर, चेहऱ्यावर वार झाले आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात तणावपूर्ण वातावरण बनले असून, रुग्णालय परिसरात त्यांच्या समर्थकांची गर्दी केली आहे. सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांच्या शोधासाठी पथक रवाना केले. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Satara Crime: लिंबे येथे माजी उपसभापतीवर कोयत्याने वार, गंभीर जखमी
By दत्ता यादव | Updated: January 2, 2023 14:42 IST