शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, नाना पटोलेंचा घणाघात 

By नितीन काळेल | Updated: February 24, 2024 15:37 IST

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४२ जागा महाविकास आघाडी जिंकण्याचा कल 

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे काम जवळपास निश्चित झाले असून ४२ मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकण्याचा कल आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आयुष्यभर काँग्रेससोबत राहिले. त्यांनीच राज्यात काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, असा घणाघातही केला.सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पटोले बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, रजनी पवार, धनश्री महाडिक, अॅड. विजयराव कणसे, प्रा. विश्वंभर बाबर, संदीप माने, जगन्नाथ कुंभार आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘राज्यातील मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली २०१४ पासून देवेंद्र फडणवीस फसवत आहेत. भाजपकडून आरक्षणाचा बागुलबुवा केला जात आहे. मराठा आणि ओबीसीत वादाचे बीज भाजपनेच रोवले. आता ते शिखरावर गेले आहे. भाजपमुळेच आरक्षणाला मुठमाती मिळालेली आहे. आता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा नुसता गवगवा केला जातोय. यातूनही भाजपने फसविण्याचेच काम केले असून मनोज जरांगे-पाटील आणि समऱ्थकांतही वाद लावला जात आहे.भाजपकडून आरक्षणमुक्त भारतचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही जातगणना करायला तयार नाहीत, असे सांगून प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तर नाही. दिल्लीजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना गोळ्या घालून मारले जात आहे. केंद्र शासनाने केलेले कायदे हे लोकशाही संपष्टात आणण्यासाठीच केले आहेत. पण, देशात आता इंडिया आघाडीचेच सरकार येणार आहे.

गॅरंटी शब्द आमचा; त्यांची गॅरंटी संपलीय..भाजप गॅरंटी शब्द वापरत आहे. पण, हा शब्द आमचा असून त्यांनी चोरला आहे. या गॅरंटीला त्यांनी अपमानीत केले आहे. त्यांची गॅरंटी आता संपली आहे, असा टोला पटोले यांनी भाजपला लगावला. तसेच धर्म, जातीच्या नावावर राजकारणाचा एक अजेंडा वापरण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.

माझ्यावर आरोप स्वाभाविक..पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून जाण्याबद्दल आणि त्यांचा रोख आपल्याकडे असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पटोले यांनी मी मंत्री नव्हतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांनी माझ्यावर आरोप करणे स्वाभाविक आहे. पण, ते आयुष्यभर काँग्रेसबरोबर राहिले. पण, पक्षाचा खासदार त्यांनी एकवर आणून ठेवला, असे ठामपणे सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाNana Patoleनाना पटोलेAshok Chavanअशोक चव्हाण