शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक नसल्याने पालक संतप्त, पहिल्याच दिवशी बंद पाडली शाळा; साताऱ्यातील घाडगेवाडी येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 18:58 IST

शाळेत नवीन शिक्षक नेमल्याशिवाय शाळा उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला

सूर्यकांत निंबाळकरआदर्की : जिल्हा परिषदेच्या घाडगेवाडी शाळेतील शिक्षकांची बदली सहा महिन्यांपूर्वी केली; परंतु त्यांच्या जागी नवीन शिक्षकाची नेमणूक झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांनी शिक्षकाची नेमणूक करा नाही तर दाखले द्या, अशी मागणी करत पहिल्याच दिवशी शाळा बंद ठेवली. शाळेत नवीन शिक्षक नेमल्याशिवाय शाळा उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.घाडगेवाडी येथील शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. शाळेत मुख्याध्यापक व चार शिक्षक होते. एका शिक्षकाची बदली करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत निर्णय घेऊन बदली केली. त्यावेळी शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षक देण्याचे आश्वासन दिले होते. तोपर्यंत ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गावातील शिक्षकांची तात्पुरती नेमणूक केली होती.शालेय व्यवस्थापन समिती यांची बैठक बुधवार, दि. १४ रोजी झाली. त्यामध्ये दि. १५ रोजी जिल्हा परिषदेची शाळा सुरू होणार आहे; परंतु सातवीच्या वर्गावर शिक्षक चारच असल्याने पाचवा शिक्षक मिळावा म्हणून गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अधिकारी यांना निवेदन दिले. त्यामध्ये शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.आज, गुरुवारी सकाळी सरपंच दादासाहेब बोबडे, पोलिस पाटील गणेश भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंभुराज बोबडे, रणजित घाडगे, किरण येळे, सुरेश साप्ते, संपतराव भोसले यांच्यासह ग्रामस्थ, महिला ग्रामपंचायत सदस्यांनी बंदचा निर्णय घेतला. शाळा बंद ठेवूनही शिक्षण विभागाचा दोन तास प्रतिनिधी न आल्याने नवीन शिक्षक येईपर्यंत मुलांना शाळेत पाठवायचं नाही, असा निर्णय घेऊन पालक दाखल्याची मागणी करत मुलांना घरी घेऊन गेले.

शिक्षकाच्या गैरवर्तणुकीमुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिक्षकांची सहा महिन्यांपूर्वी बदली होऊनही पाचवा शिक्षक न आल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. - संतोष पवार,  अध्यक्ष, शालेय व्यवस्थान समिती, घाडगेवाडी .

घाडगेवाडी येथे शिक्षकाने गैरवर्तन केल्याने ग्रामसभेत निर्णय घेऊन बदली केली. परंतु, दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक केली नाही. वारंवार विनंती करूनही शिक्षकाची नेमणूक न केल्याने शिक्षकांची शाळा बंद ठेवणार आहे. - दादासाहेब बोबडे सरपंच, घाडगेवाडी

फलटण तालुक्यात १५० शिक्षक कमी आहेत. त्यामुळे घाडगेवाडी शाळाला शिक्षक देण्यासाठी वरिष्ठाशी चर्चा करून शुक्रवार, दि. १६ रोजी शिक्षक देणार आहे. तोपर्यंत पालकांसह ग्रामस्थानी सहकार्य करावे, असे आवाहन फलटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शाहीन पठाण यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळाTeacherशिक्षक