‘पिंजरा’मधील कलाकार अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:58 IST2017-11-12T22:57:34+5:302017-11-12T22:58:20+5:30

The artist in 'trap' killed in an accident | ‘पिंजरा’मधील कलाकार अपघातात ठार

‘पिंजरा’मधील कलाकार अपघातात ठार


सातारा : वाई तालुक्यातील वेळे येथे असणाºया पिंजरा कला केंद्रातील कलाकार वादक सोमनाथ वसंत काळोखे (वय ३८, रा. रविवार पेठ, वाई) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने ते ठार झाले. हा अपघात शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास झाला.
सोमनाथ काळोखे हे शनिवारी रात्री दुचाकीवरून घरी निघाले होते. यावेळी वेळे परिसरातच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. त्यात ते गंभीर जखमी झाले. या अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयातील पोलिसांनी सांगितले.

Web Title: The artist in 'trap' killed in an accident

टॅग्स :Accidentअपघात