कांद्याच्या सतरा हजार पिशव्यांची आवक लोणंद बाजार समिती ; दरातील चढ-उतारामुळे शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:56 IST2018-02-19T23:54:15+5:302018-02-19T23:56:45+5:30
लोणंद : कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळव्या कांद्यांच्या सतरा हजार पिशव्यांची आवक झाली.

कांद्याच्या सतरा हजार पिशव्यांची आवक लोणंद बाजार समिती ; दरातील चढ-उतारामुळे शेतकरी हवालदिल
लोणंद : कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळव्या कांद्यांच्या सतरा हजार पिशव्यांची आवक झाली. कांद्याचे दर दीड हजार रुपये प्रति क्ंिवटलपर्यंत तेजीत निघाले. दरामध्ये चढ-उतार होत असल्याने कांदा काढणीस आलेले शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्प्याने लोणंद बाजार समितीत विक्रीस आणत आहेत.
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा खरेदी-विक्रीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत खंडाळा, फलटण, माण, कोरेगाव, वाई, पुरदंर, बारामती तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस येतो. लोणंद परिसरात पिकणाºया दर्जेदार कांद्यामुळे कांद्याचा देशभरात नावलौकिक आहे.
कांदा नाशवंत पीक असून, उन्हाळ्यात शेतकºयांनी साठवलेला गरवा कांदा काही काळापर्यंत मार्केटला पुरतो. उन्हाळी कांदा फक्त महाराष्ट्रातच पिकतो, त्यामुळे नंतर नवीन हळवा कांदा बाजार येईपर्यंत कांदाचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाण कांदा पिकतो. यंदा पडलेला पाऊस सर्वत्रच कांदा पिकास पोषक वातावरण असून, कांदा उत्पादक भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यामधील कांदयाची आवक चांगलीच वाढलेली दिसत आहे.
लोणंद कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळव्या कांद्याची आवक सतरा हजार पिशव्या झाली आहे. कांद्याचे दर दीड हजार रुपये प्रति क्विटंलपर्यंत निघाले. कांद्याचा दर दीड हजार रुपयांवर गेल्याने कांदा उत्पादकांना अनेक वर्षांनी चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. लोणंद बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्याने कांदा काढणीस आलेले कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्प्याने लोणंद विक्रीस आणताना दिसत आहे.
कांद्याचे दर (प्रति क्विंटल)
यामध्ये नंबर एक १, २०० ते १,५००. नंबर दोन ९०० ते १, २०० तर तीन नंबरचा कांदा ५०० ते ९००. गोल्टी कांदा ५०० ते ७०० रुपये असे निघाले आहेत.
प्रतवारी करून आणावे
लोणंद बाजार समितीमध्ये शेतकºयांनी कांदा चांगला वाळवून प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती दत्तात्रय बिचुकले व सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले.