शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील साधुसंतांचा मेळा विसावला शाहूनगरीत!

By admin | Updated: November 9, 2015 23:20 IST

दोन दिवस मुक्काम : श्री नवनाथ झुंडीच्या साधूंचे सातारकरांनी केले वाजतगाजत स्वागत

सातारा : साधू संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा असे म्हटले जाते. अखिल भारतवर्षीय भेष वारह पंथ अवधूत संप्रदाय - श्री नवनाथ झुंडीच्या साधूंचे ऐन दिवाळीतच सातारा नगरीत मोठ्या उत्साहात व भक्तिभावात स्वागत झाले. ढोल-ताशांच्या निनादात, पुष्पवृष्टीत, रांगोळ्यांच्या सजावटीत व फटाक्यांच्या आतषबाजीत साधू, महंतांचे शाहूनगरीत स्वागत झाले. महानुभाव मठाशेजारील श्री नवदुर्गा मंदिरापासून गोरक्षनाथांच्या पादुका घेऊन या साधूंची वाजतगाजत करंजे, प्रतापगंज पेठ, मोती चौक, राजपथ व श्री शनिमारूती मंदिर, शनिवार पेठ या मार्गे मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, शनिमारूती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब ठक्कर, ठाकोरभाई शहा, अण्णा बेंद्रे, किशोर घोडके, किरण गेंगजे यांनी ट्रस्टच्या वतीने साधूंचे स्वागत केले.या साधूंचे दोन दिवस श्री शनि मारूती मंदिर, शनिवार पेठ येथे वास्तव्य असणार आहे. दि. ११ रोजी पुढील मुक्कामी ते जाणार आहेत. यावेळी श्री गोरक्षनाथांच्या पादुकांची पूजा, धुनी प्रज्वलन आदी कार्यक्रम झाले. सातारकरांसाठी हा अभूतपूर्व योग असल्याने साधूंच्या दर्शनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन बाळासाहेब ठक्कर यांनी केले आहे. (प्रतिनिधी) १८०० किलोमीटरची पदयात्रा श्री नवनाथ झुंडीमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले या सांप्रदायाचे ४६० साधू सहभागी झाले आहेत. कुंभमेळ्यानंतर त्र्यंबकेश्वर येथून कदली मठ (मेंगलोर) कर्नाटक येथे श्री नवनाथ झुंडी सांप्रदायाच्या साधूंची पदयात्रा चालली आहे. या साधूंची ही १८०० किलोमीटर अंतराची पदयात्रा असून या पदयात्रेचा आरंभ नागपंचमीच्या दिवशी १९ एप्रिल २०१५ झाला आहे. ७ मार्च २०१६ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी ही पदयात्रा कदली मठ येथे पोहोचणार आहे. एकूण ९३ मुक्कामांमध्ये ही पदयात्रा होणार असून सातारा शहरातील मुक्काम हा ३९ वा टप्पा असल्याचे नवथान झुंडीच्या साधूंनी सांगितले.शनिमारुती मंदिर येथे वास्तव्यदर १२ वर्षांनंतर अशा पध्दतीची ही पदयात्रा होत असून याला हजारो वर्षांची परंपरा असल्याचे साधूंनी सांगितले. सातारा शहरातील शनिमारूती देवस्थानाला या सांप्रदायामध्ये विशेष महत्त्व असल्याने सातारा शहरातील दोन दिवसांचा मुक्काम याच ठिकाणी होणार असल्याचे साधूंनी सांगितले.