शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वाठार येथील पेट्रोलपंपांवर सशस्त्र दरोडा, हल्ल्यात कर्मचारी जखमी; सव्वालाखाची रोकड लांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:32 IST

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड तालुक्यातील वाठार हद्दीतील गणेश पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री एक वाजता सशस्त्र दरोडा पडला. पेट्रोलपंपामध्ये ...

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड तालुक्यातील वाठार हद्दीतील गणेश पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री एक वाजता सशस्त्र दरोडा पडला. पेट्रोलपंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोर युवकांनी पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले. त्यांनी कर्मचाऱ्याजवळील सुमारे सव्वालाखांची रोकड हिसकावून तेथून पोबारा केला.दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पेट्रोलपंपावरील परशुराम सिद्धार्थ दुपटे हा कर्मचारी जखमी झाला आहे. महामार्गालगत असलेल्या पेट्रोलपंपावर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे. वाठार हद्दीत महामार्गालगत ऋषिकेश पांडुरंग गावडे यांच्या मालकीचा गणेश पेट्रोलपंप आहे. या पंपावर सोमवार, दि. १० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कर्मचारी परशुराम दुपटे येणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करत होते.रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरून दोन युवक पेट्रोलपंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यांनी दुपटे यांच्याकडून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून घेतले. त्याचवेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने दुपटे यांना पेट्रोलचे पैसे दिले. ते पैसे घेऊन दुपटेे आपल्याजवळील बॅगमध्ये ठेवत असतानाच पाठीमागील युवकाने त्याच्या शर्टातून आणलेला कोयता काढून दुपटे यांच्या अंगावर, पायावर आणि हातावर सपासप वार केले. ते वार चुकवत दुपटे यांनी तेथून पळ काढला. त्याचवेळी दरोडेखोरांनी दुपटे यांच्या हातातील बॅग हिसकावून घेत दुचाकीवरून तेथून पोबारा केला. त्या बॅगमधील १ लाख २० हजार ९३५ रुपये दरोडेखोरांनी पळवून नेले.

घटना घडल्यानंतर याबाबत पेट्रोलपंपाचे मॅनेजर नीलेश तावरे व मालक ऋषिकेश गावडे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर मॅनेजर तावरे यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. पेट्रोलपंपावर दरोडा पडल्याची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस