भाजप अल्पसंख्याकच्या राज्य सरचिटणीसपदी अनुप शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:40 IST2021-05-09T04:40:38+5:302021-05-09T04:40:38+5:30

फलटण : येथील सकल जैन समाजाचे युवा नेतृत्व, कृतिशील नगरसेवक अनुप रमणलाल शहा यांची भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा ...

Anup Shah as BJP Minority State General Secretary | भाजप अल्पसंख्याकच्या राज्य सरचिटणीसपदी अनुप शहा

भाजप अल्पसंख्याकच्या राज्य सरचिटणीसपदी अनुप शहा

फलटण : येथील सकल जैन समाजाचे युवा नेतृत्व, कृतिशील नगरसेवक अनुप रमणलाल शहा यांची भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरांवरून कौतुक होत आहे.

अनुप शहा यांच्या विविध क्षेत्रांतील धडाकेबाज कामाची व भाजपच्या कार्याची दखल घेऊन भाजप पक्ष महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष इजाज देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीसपदी अनुप शहा यांची नियुक्ती केली आहेे.

त्यांच्या कामाची दखल घेऊन खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांची भाजप प्रदेश कार्यकारिणीकडे शिफारस केली असल्याची माहिती भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली आहे. निवडीबद्दल त्यांचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक-निंबाळकर, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे, महिला आघाडी अध्यक्षा उषा राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कौतुक केले.

०८अनुप शहा आयकार्ड फोटो आहे.

Web Title: Anup Shah as BJP Minority State General Secretary