साताऱ्यात विनापरवाना फ्लेक्सप्रकरणी आणखी एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 15:54 IST2018-12-14T15:53:50+5:302018-12-14T15:54:59+5:30
सातारा शहर परिसरात ठिकठिकाणी वाढदिवसाचे विनापरवाना फ्लेक्स लावल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, गुन्ह्यांची संख्या आता तीन झाली आहे.

साताऱ्यात विनापरवाना फ्लेक्सप्रकरणी आणखी एक गुन्हा
सातारा : शहर परिसरात ठिकठिकाणी वाढदिवसाचे विनापरवाना फ्लेक्स लावल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, गुन्ह्यांची संख्या आता तीन झाली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, नगरसेवक शेखर मोरे यांच्यावर विनापरवाना फ्लेक्स लावण्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विसावा नाका, गोडोली या ठिकाणी वाढदिवसाचे मोठे फ्लेक्स लावण्यात आले होते.
पोलिसांनी ते सर्व फ्लेक्स जप्त केले आहेत. दरम्यान, दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही पोलिसांनी संभाजी इंदलकर (रा. मोळाचा ओढा परिसर) यांच्यावर विनापरवाना फ्लेक्स लावण्याचा गुन्हा दाखल केला. सार्वजनिक ठिकाणाचे विद्रुपीकरण केल्याचा ठपका संबंधितावर ठेवण्यात आला आहे.