शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!

By नितीन काळेल | Updated: October 19, 2024 21:41 IST

जिल्ह्यात आतापर्यंत तिघांना उमेदवारी : चंद्रकांत कांबळे, संजय गाडे रिंगणात.

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी ‘वंचित’ उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असून शनिवारी आणखी १६ नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिणमधून संजय गाडे आणि कोरेगाव मतदारसंघात चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघेही ‘रिपाइं’ गवई गटाचे पदाधिकारी आहे. तर आतापर्यंत ‘वंचित’चे जिल्ह्यात तीन उमेदवार जाहीर झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठीही तयारी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. शनिवारी ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील १६ मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. संजय गाडे यांना कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे. याठिकाणी काॅंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण हे रिंगणात उतरणार आहेत. तर भाजपकडून अतुल भोसले मैदानात असतील. कोरेगाव मतदारसंघातही ‘वंचित’ने चंद्रकांत कांबळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे.

‘रिपाइं’ गवई गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे आहेत. तर याच पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे आहेत. या दोघांनीही ‘वंचित’कडे उमेदवारीची मागणी केली होती.

माणमधून इम्तियाज नदाफ उमेदवार...वंचित बहुजन आघाडीच्या ९ आॅक्टोबरच्या दुसऱ्या यादीत माण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली. इम्तियाज नदाफ यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यातच ‘वंचित’ जिल्ह्यातील सर्वच आठ मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची नावेही लवकरच जाहीर होतील, असेही ‘वंचित’कडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी