शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बायको अन् मुलाला पाठवत नसल्याचा राग, गाडी अंगावर घालून आजे सासूचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 13:25 IST

खटाव : खटाव तालुक्यातील दरोज येथे बायको आणि बाळास तिच्या माहेरचे नातेवाईक पाठवत नाहीत, या रागातून आजे सासूच्या अंगावर ...

खटाव : खटाव तालुक्यातील दरोज येथे बायको आणि बाळास तिच्या माहेरचे नातेवाईक पाठवत नाहीत, या रागातून आजे सासूच्या अंगावर गाडी घालण्यात आली. यामध्ये जखमी आजे सासूचा सोमवार, दि. १३ रोजी सांगली येथे मृत्यू झाला. याप्रकरणी जावई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालन शंकर आवळे असे खून झालेल्या आजे सासूचे नाव असून सागर उमापे असे गाडी घातलेल्या जावयाचे नाव आहे.मुलीची आई सीमा विठ्ठल लोखंडे यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार खुनाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तक्रारीवरून पुसेगाव पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सीमा विठ्ठल लोखंडे यांचे राहते घरासमोरील रस्त्यावर त्यांचा जावई सागर संपत उमापे (मुळ रा. राजाचे कुर्ले ता. खटाव जि. सातारा, सध्या रा. गंगापूर शिवनगर, आनंद कॉलनी नाशिक) याने पत्नी आणि बाळाला सासरचे मंडळी पाठवत नाहीत, या कारणावरून चिडून घरातील लोकांशी भांडण केले. तसेच पत्नीची आजी शालन शंकर आवळे (वय ५३) यांच्याकडे रागात बघून ‘जे होतंय ते ह्या म्हातारी मुळेच होतय हिला जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणून त्याचे ताब्यातील कार (एमएच ४७ एन १९३३) ही चालू करून गाडी पाठीमागे घेऊन पुन्हा गाडी जोरात पुढे घेऊन तिचे अंगावर घातली. यात शालन आवळे यांना गंभीर जखमी केले होते. गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या शालन शंकर आवळे यांना तातडीने सांगली येथे उपचारासाठी नेण्यात आले. यादरम्यान त्यांचा सांगली येथील रुग्णालयात सोमवार, दि. १३ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर खुनाच्या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस