मलकापूर: इस्लामपूरहून सातारकडे निघालेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. इम्राण मुनीर पठाण ( वय ४२, रा. सदरबझार, सातारा) व राजू अजाद शेख (३९, गुरूवारपेठ, सातारा ) अशी मृत दोघांची नावे आहेत. पुणे-बंगळूर महामार्गावर पाचवडफाट्या नजीक रात्री उशिरा हा अपघात झाला.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा येथील इम्राण व राजू हे दोघे दुचाकी ( क्रमांक एम एच ११ बी टी २८०१) वरून इस्लामपूरला गेले होते. तेथील काम आटोपून परत ते साताऱ्याकडे निघाले होते. पुणे-बंगळूर महामार्गावर गुरूवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाचवडफाट्याजवळ आले.दरम्यान, कोल्हापूरकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी ए पी. भालेराव, संजय माने यांच्यासह कर्मचारी, हवालदार खलील इनामदार, प्रशांत जाधव व महामार्ग पोलिस कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवून देण्यात आले.
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, सातारचे दोघे जागीच ठार; कराड नजीक अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:17 IST