शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात वीज तोडायला गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला वृध्दाची धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:50 IST

एकाच आडनावावरुन झालेल्या गैरसमजातून प्रकार

सातारा : वीजबिल थकीत असल्याने वीज वितरणच्या महिला टेक्निशियन वीज कनेक्शन तोडायला इमारतीजवळ गेल्या. पण एकाच नावाच्या दोन आडनावांमुळे गैरसमज झाला अन् पुढे भलतंच घडलं. आमची लाईट कट करायला आल्याचा गैरसमज करून वृद्धाने महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार समर्थ मंदिर येथील रवी पार्क अपार्टमेंटमध्ये दि. १७ रोजी दुपारी २ वाजता घडला.शाहूपुरी पोलिसांनी सांगितले की, समर्थ मंदिर येथील रवी पार्क अपार्टमेंटमधील पवार नामक व्यक्तीने वीजबिल थकवल्याने वीज वितरणच्या टेक्निशियन प्रियांका खाडे (वय २८, रा. मंगळवार पेठ, सातारा) या तेथे गेल्या होत्या. अपार्टमेंटजवळ गेल्यानंतर तेथे शत्रुघ्न पवार (वय ६६) उभे होते. त्यांनी खाडे यांना विचारले, कशासाठी आला आहात. तेव्हा प्रियांका खाडे यांनी पवार यांनी वीजबिल थकवले आहे. त्यांची लाईट कट करायला आले आहे, असे सांगितले.यावर संतप्त होऊन पवार बोलू लागले. ‘आम्ही वीजबिल भरले आहे. तुम्ही आमची लाईट कट करूनच दाखवा,’ असं म्हणत त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच शिवीगाळ, धक्काबुक्की केली. हा वाद गैरसमजुतीमधून झाला. वास्तविक एकाच इमारतीमध्ये पवार आडनावाची दोन कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रियांका खाडे यांना दुसऱ्या पवारांची लाईट वीज तोडायची होती. परंतु, शत्रुघ्न पवार यांना त्यांची वीज तोडायला आल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे पुढे वाद वाढला.

अखेर वीज तोडलीया वादानंतर खाडे यांनी ज्या पवारांची लाईट कट करायची होती, ती लाईट कट केली. परंतु, गैरसमजुतीतून हा वाद झाल्याने हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. खाडे यांच्या तक्रारीवरून शत्रुघ्न पवार यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हवालदार संदीप मदने हे अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Elderly Man Assaults Female Electricity Worker Over Bill Dispute

Web Summary : Confusion over similar names led to an elderly Satara resident assaulting a female electricity worker who came to disconnect power for unpaid bills. Police have registered a case against the man for obstructing a public servant.