शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

साताऱ्यात वृद्ध दाम्पत्याने विष पिऊन संपवले जीवन, घरातील दुर्गंधीमुळे घटना उघड

By दत्ता यादव | Updated: September 6, 2023 16:20 IST

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सातारा : येथील शुक्रवार पेठेतील एका वृद्ध दाम्पत्याने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. ६ रोजी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. उत्तमराव भाऊसाहेब शिंदे (वय ८६), प्रभावती उत्तमराव शिंदे (७५) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उत्तमराव शिंदे यांचे पोवई नाक्यावर छोटंसं दुकान आहे. या दुकानात ते नेहमी जायचे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून ते दुकानात गेले नाहीत. दरम्यान, बुधवारी दुपारी घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे तातडीने कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले. खिडकीतून हात घालून पोलिसांनी दरवाजा उघडला. त्यावेळी उत्तमराव शिंदे आणि प्रभावती शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या मृतदेहाशेजारीच विषारी औषधाची बाटली पोलिसांना सापडली. चार दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघेच घरात राहत होते. प्रभावती यांना वयोमानामुळे स्वयंपाक करता येत नसल्यामुळे बाहेरहून ते रोज जेवणाचा डबा आणत होते. त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप पुढे आले नाही. त्यांना दोन मुले असून, ही मुले शहरातच वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस