शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याजवळ तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, तरुणीने स्वत:च करुन घेतली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:34 IST

एकावर गुन्हा दाखल 

सातारा : एका महाविद्यालयीन तरुणीवर शेतात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला पेट्रोल टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सातारा तालुक्यातील एका गावात दि.२८ सप्टेंबर राेजी सायंकाळी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २२ वर्षांची असून, ती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दि.२८ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता ४० वर्षांच्या संशयिताने तरुणीच्या पायाला पकडून तिला गवतात ओढले. तिच्यावर त्याने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने पेट्रोलची बाटली दाखवून मी तुला जाळून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच डोक्याचे केस ओढून हाताने बुक्क्यांनी मारहाण करून तिच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर पीडित तरुणीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयितावर विनयभंगसह मारहाणीचा गुन्हा दाखल केला. हवालदार आशिष कुमठेकर हे अधिक तपास करीत आहेत.

तरुणीने स्वत:च करुन घेतली सुटकापीडित तरुणीला शेतात ओढल्यानंतर संशयिताने तिचा ओढणीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा अवस्थेतही पीडित तरुणीने आरडाओरड करून संशयिताच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. घरी गेल्यानंतर शेतात घडलेला प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना समजला. संबंधित गावाच्या जवळच हा प्रकार घडल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस