शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातानंतर ट्रकचालक झाला पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:39 IST

हेल्मेट असते तर वाचला असता जीव

सातारा : येथील वाढे फाट्यावर ट्रकच्या चाकाखाली सापडून साताऱ्यातील एका १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री अकरा वाजता झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.आकाश नंदकुमार गोळे (वय १८, रा. मंगळवार पेठ, सातारा), असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आकाश गोळे हा रविवारी दुपारी दुचाकीवरून त्याच्या मित्राला सोडायला लाेणंद येथे गेला होता. तेथून तो दुचाकीवरून परत साताऱ्याकडे येत होता. वाढे फाटा पुलापासून पुढे आल्यानंतर ओंकार हाॅटेलसमोर पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा त्याला धक्का लागला. त्यामुळे त्याचा तोल गेल्याने तो रस्त्यावर पडला. यातच ट्रकचे मागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार जयवंत कारळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले. एका सीसीटीव्हीमध्ये ट्रक दिसत आहे. परंतु ट्रकचा नंबर स्पष्टपणे दिसत नाही. वाढे गावातील सीसीटीव्ही फुटेज आता तपासले जाणार आहेत. या अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

हेल्मेट असते तर जीव वाचला असताआकाश गोळे हा एका गॅरेजमध्ये काम करत होता. अपघातावेळी त्याने जर हेल्मेट घातले असते तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता. डोक्यावरून जरी चाक गेले असते तरी हेल्मेटमुळे चाक निसटले असते. दर्जेदार हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचला असता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.