रेणुकामाता पतसंस्थेत १७ लाखांचा अपहार
By Admin | Updated: December 19, 2014 00:11 IST2014-12-19T00:04:16+5:302014-12-19T00:11:40+5:30
आर्थिक फायद्यासाठी अवैधरीत्या वेगवेगळ्या रकमांच्या बोगस नोंदी रोजकीर्दमध्ये घेतल्या.

रेणुकामाता पतसंस्थेत १७ लाखांचा अपहार
सातारा : गोडोली येथील रेणुकामाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत १७ लाख ३८ हजार ७९९ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश रंगनाथ कुलकर्णी (रा. शाहूनगर गोडोली, सातारा) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुलकर्णी यांनी स्वत:च्या पदाचा गैरवापर करून संस्थेतील १२ सदस्यांची बेकायदेशीर नियुक्ती केली. आर्थिक फायद्यासाठी अवैधरीत्या वेगवेगळ्या रकमांच्या बोगस नोंदी रोजकीर्दमध्ये घेतल्या. रकमांमध्ये खाडाखोड करून स्वत:च्या हस्ताक्षरात नोंदी करून पगार बिले तसेच कार्यालयीन खर्च, भाडे, प्रवास खर्च, स्टेशनरी, देणग्या, असा खर्च दाखवून बोगस नोंदी केल्याचे उघडकीस आले. १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१० या कालावधीत हा अपहार झाला असून, लेखापरीक्षक राणी शिवाजीराव धायताडे यांनी फिर्याद दिली. (प्रतिनिधी)