अमेय चौधरीची दिल्ली येथील परेडसाठी निवड
By Admin | Updated: January 12, 2015 21:48 IST2015-01-12T21:36:27+5:302015-01-12T21:48:03+5:30
कोल्हापूर येथे झालेल्या फायरिंग व वैयक्तिक ड्रिल या दोन प्रकारांत सुवर्णपदक मिळवित सर्वांचे लक्ष वेधून घेतले

अमेय चौधरीची दिल्ली येथील परेडसाठी निवड
वाई : २६ जानेवारी २०१५ रोजी राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी द्रविड हायस्कूल वाई येथील एनसीसी छात्र अमेय मंगेश चौधरी याची महाराष्ट्र एनसीसी ट्रुपमध्ये निवड झाली आहे़ २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा अंतर्गत १२ सप्टेंबर २०१४ ते २१ सप्टेंबर २०१४ दरम्यान कोल्हापूर येथे झालेल्या फायरिंग व वैयक्तिक ड्रिल या दोन प्रकारांत सुवर्णपदक मिळवित सर्वांचे लक्ष वेधून घेतले व कोल्हापूर व औरंगाबाद येथे झालेल्या कॅम्पमध्ये त्याने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्याची प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी निवड करण्यात आली़ अमेय चौधरी हा विद्यार्थी द्रविड हायस्कूल व परिसरातील निवड झालेला पहिला विद्यार्थी आहे़ ही अतिशय अभिमान व इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी साताराचे कमांडिंग आॅफिसर कर्नल एस. के़ पांडे, नागेश मोने, एनसीसी आॅफिसर महेश इनामदार व मंगेश चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभले़
चौधरी याने मिळविलेल्या देदीप्यमान संधीबद्दल शालासमिती अध्यक्ष डॉ. संजीव गोखले, सदस्य अमित कुलकर्णी, डॉ. जालिंदर लाजेंकर, मुख्याध्यापक पी. डी. शिंदे, पर्यवेक्षक मराठे आदींनी त्याचे कौतुक केले़ (प्रतिनिधी)