रुग्णवाहिका यांचे दर निश्चित : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:40 IST2021-05-13T04:40:29+5:302021-05-13T04:40:29+5:30

सातारा : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रुग्णवाहिका यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद ...

Ambulance rates fixed: Chavan | रुग्णवाहिका यांचे दर निश्चित : चव्हाण

रुग्णवाहिका यांचे दर निश्चित : चव्हाण

सातारा : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रुग्णवाहिका यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.

व्हॅनसाठी प्रति २० किलोमीटरपर्यंत अथवा दोन तासांकरिता साडेतीनशे रुपये, तर १२ रुपये प्रति किलोमीटर शासकीय अधिग्रहण केलेल्या वाहनांकरिता चोवीस तासांसाठी, जीप सुमो अशा वाहनांकरिता २० किलोमीटरपर्यंत साडेचारशे रुपये प्रति किलोमीटर १३ रुपये शासकीय अधिकाऱ्याने केलेल्या वाहनासाठी पंधराशे रुपये, मोठ्या वाहन्यासाठी प्रति २० किलोमीटर साडेपाचशे रुपये आणि शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या वाहनासाठी दोन हजार रुपये, वातानुकूलित वाहनांसाठी वीस किलोमीटरच्या अंतरासाठी सातशे रुपये, प्रति किलोमीटरसाठी वीस रुपये आणि शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या वाहनासाठी तीन हजार रुपये इतके दर ठरवून देण्यात आले आहेत.

ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जादा दर आकारता येणार नाही, तसेच त्यापेक्षा कमी दराने भाडे आकारले तरी त्याला परवानगी राहील, असे देखील कळवण्यात आलेले आहे.

Web Title: Ambulance rates fixed: Chavan