रुग्णवाहिकेची पार्किंगमधील वाहनांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:50+5:302021-03-23T04:41:50+5:30

पाचगणी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता दरम्यान रुग्णवाहिकेने रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या चार ...

Ambulance hits vehicles in parking lot | रुग्णवाहिकेची पार्किंगमधील वाहनांना धडक

रुग्णवाहिकेची पार्किंगमधील वाहनांना धडक

पाचगणी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता दरम्यान रुग्णवाहिकेने रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या चार गाड्यांना धडक दिल्याने चारही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, खेड (जि. रत्नागिरी) येथील एक रुग्णवाहिकामधून (एमएच ०८ डब्लू ३७०४) तेथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृताला घेऊन आली होती. ते मयत सोडून ही रुग्णवाहिका वाई घाट चढून पहाटे पाचगणी येथील शिवाजी चौकात आली असता. चौकात पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या चारचाकी यामध्ये (एमएच १२ एमएफ ८१८५, एमएच ११ सीडी ६६३८, एमएच ११ बीएफ १११०, एमएच १२ आरटी २०९६) या चार गाड्यांना धडक या रुग्णवाहिकेने जबरदस्त धडक दिल्याने या चारही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, या सर्व गाड्या मागच्या बाजूने एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे या गाड्यांचा मागील बाजूचा चक्काचूर झाला.

पाचगणी पोलिसांनी पंचनामा केला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Ambulance hits vehicles in parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.