शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अंबवडे बुद्रुक बनतंय किल्ल्यांचं गाव ! इतिहासाचे जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 12:10 PM

fort, Mahabaleshwar Hill Station, sataranews महाबळेश्वर तालुक्यातील भिलार पुस्तकांचं गाव, किकली विरगळांचं अन् जकातवाडी कवितेचं गाव म्हणून नावारुपास येत असताना सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक हे गावही किल्ल्यांचं गाव म्हणून ओळख दृढ करू लागलं आहे. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी या गावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गड-किल्ले बनविले जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून येथील तरुणांनी ही परंपरा जोपासली आहे.

ठळक मुद्देअंबवडे बुद्रुक बनतंय किल्ल्यांचं गाव ! इतिहासाचे जतनराजगड, रायगड, तोरणा अन् सज्जनगडाची प्रतिकृती वेधतेय लक्ष

अक्षय सोनटक्केपरळी : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार पुस्तकांचं गाव, किकली विरगळांचं अन् जकातवाडी कवितेचं गाव म्हणून नावारुपास येत असताना सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक हे गावही किल्ल्यांचं गाव म्हणून ओळख दृढ करू लागलं आहे. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी या गावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गड-किल्ले बनविले जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून येथील तरुणांनी ही परंपरा जोपासली आहे.साताऱ्यात अनेक गड-किल्ले आहेत ते आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. हेच अस्तित्व राखण्यासाठी जतन करण्यासाठी अंबवडे बुद्रुक येथील ग्रामस्थ गेल्या आठ वर्षांपासून दिवाळीत गड-किल्ल्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या अंबवडे बुद्रुक या गावात २०१२ पासून म्हणजे गड-किल्ल्यांची स्पर्धा भरवली जाते. गावात दरर्षी ३० ते ४० किल्ल्यांच्या प्रतिकृती उभ्या केल्या जातात. यंदाही गावात जवळपास ४० गड-किल्ले उभारण्यात आले आहेत. राजगड, रायगड, तोरणा अन् सज्जनगडाची प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.किल्ले बनविण्यासाठी दगड, माती, शेण, राख अशा सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. पर्यावरण संतुलन राखावे, यासाठी किल्ल्यावर उभारण्यात आलेले सैन्यही कागदापासून तयार करण्यात आले आहे. इतिहासाचे संवर्धन करण्याबरोबरच मुलांमध्ये शिवरायांचे विचार रुजण्यासाठी किल्ले बनविण्याची परंपरा अखंडपणे सुरूच ठेवणार असल्याचे निर्धार येथील तरुणांनी केला आहे.एक गुंठे क्षेत्रात उभारणीसातारा जिल्ह्यातील गडप्रेमींना आंबवडे येथे प्रतापगड, रामशेज, तोरणा, जंजिरा, विजयदुर्ग, सज्जनगड, रायगड, राजगड यांसारख्या कित्येक गडकिल्ले पाहायला मिळत आहे. तब्बल एक ते दोन गुंठे क्षेत्रात साकारलेल्या किल्यांची भव्य-दिव्य प्रतिकृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानFortगडSatara areaसातारा परिसर