शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना धरणात पाणीसाठा कमी, तरी जुलैपर्यंत चिंता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 12:25 IST

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या कोयना धरणातीलपाणीसाठा मे महिनाअखेर कमी झाला असला तरी किमान दि. १५ जुलैपर्यंतही चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे.राज्यातील बहुतांशी भागांत पाणीबाणी सुरू असताना राज्यातील तारणहार ठरलेल्या कोयना प्रकल्पाकडे पाणी मागणीचा भार वाढला होता. यादरम्यान कोयना धरणाच्या पायथा वीजगृह व नदी विमोचकातून कोयना नदीपात्रात गेले चार महिने अपवाद वगळता अखंडपणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पूर्वेकडील कोयना, कृष्णा नदीवर अवलंबून असलेल्या भागाची तहान भागली व शेतीला उपयुक्त ठरले. ऐन दुष्काळजन्य स्थितीत कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे वीजनिर्मितीसह कृष्णा, कोयना नदीकाठ जलसमृद्ध करत दुष्काळ भागांनाही दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोयना प्रकल्पाकडून झाले आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठा असलेल्या कोयना धरणातील तब्बल ४४.२५ टीएमसी पाणी हे धरणातून पूर्वेकडे सिंचन व पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात २१.९३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून जून महिन्यात जरी पावसाने दडी मारली तरी किमान १५ जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा धरणात आहे.कोयना धरणातील गत दोन वर्षे कोयना जलविद्युत प्रकल्पाने लवादाच्या मर्यादेपेक्षा अतिरिक्त पाण्याचा वापर वीजनिर्मिती करून राज्याला वीज संकटातून वाचवले होते. चालू वर्षी तांत्रिक वर्ष संपायला पाच दिवस बाकी असताना लवादाने निर्धारित केलेला ६७.५० टीएमसी पाणीसाठ्यापैकी ५४.७६ टीएमसी इतकाच पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी झाला. त्यामुळे चालू तांत्रिक वर्षात वीजनिर्मितीसाठीचा आरक्षित पाणीसाठा संपण्याची शक्यता कमी आहे.

पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग..-कोयना धरणात एकूण पाणीसाठा २१.९३ टीएमसी इतका असून मृतसाठा वगळता उपयुक्त पाणीसाठा १६.८१ टीएमसी आहे. कोयना धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येणारे नदी विमोचक गेट चालू वर्षी दि. २० फेब्रुवारीला सुरू करण्यात आले होते. मार्च महिन्यातील दोन दिवस वगळता सलग सुमारे चार महिने सुरू होते.-रविवारी दुपारी सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्याने नदी विमोचकातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने पाठ फिरवल्याने धरणाच्या पायथा वीजगृहातून ऑक्टोबर महिन्यात सुरू केलेला पाण्याचा विसर्ग काही अपवाद वगळता आजवर सुरूच आहे. सध्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी