शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

VidhanSabha Election 2024: आता राजकीय फटाके फुटणार; सातारा जिल्ह्यात नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही लागले तयारीला

By दीपक शिंदे | Updated: October 16, 2024 15:49 IST

जनता कोणाच्या बाजुने उभी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार 

दीपक शिंदे सातारा : आज, उद्या करत करत अखेर विधानसभा निवडणूक जाहीर झाली. निवडणुकीअगोदर राजकीय बदलाबदलीचे सुरू झालेले वातावरण अजून तापणार असून यापुढेही असेच फटाके दिवाळी अगोदर फुटत राहणार, असे चित्र दिसत आहे. लोकसभेत महायुतीलामहाविकास आघाडीने रोखल्यामुळे आता महायुती अधिक आक्रमक झाली आहे. तर शरद पवारांना सोडून गेलेले लोक आता पुन्हा येऊ लागल्याने महाविकास आघाडीचीही हवा होऊ लागली आहे. यामध्ये जनता कोणाच्या बाजुने उभी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या आहेत. लोकसभेला मिळालेली मते आणि विधानसभेचे गणित यांचा कधीच मेळ घालता येत नाही. लोकसभेला १२ ते १३ लाखांचा मतदारसंघ असतो तर विधानसभेला हेच मतदान अगदी दीड ते तीन लाखांपर्यंत आलेले असते. जेवढे मतदान कमी तेवढा धोका अधिक असतो. त्यातच पुन्हा जाती-पातीचे राजकारण, फाटाफूट आणि नाराजी यामुळे अधिक अडचणी वाढतात. लोकसभेतील लोकांच्या प्रतिसादानंतर महायुतीने विविध योजनांचा धडाका लावत लोकांना आपणच फक्त तुमचा विचार करू शकतो, असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने विविध महामंडळे सुरू केली आहेत. महिला, विद्यार्थी, वृद्ध या सर्वांसाठी योजना सुरू केल्यामुळे त्यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाविकास आघाडीने राज्यात होणारे खून, बलात्कार, महिलांना संरक्षण न मिळणे आणि राज्याला आर्थिक अडचणीत आणणे, असे आरोप करत राज्याकडे भविष्याच्या दृष्टीने पाहणारा दूरदर्शी नेता नसल्याचा आरोप केला जात आहे.

या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..आमदार शिवेंद्रसिंहराजे सातारा - सातारा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यावेळी पुन्हा पाचव्यांदा रिंगणात आहेत. त्यांची एकतर्फी लढत असल्याचे म्हटले जात असले तरी या  लोकांना गृहीत धरून चालत नाही. 

आमदार बाळासाहेब पाटील कऱ्हाड उत्तर - येथून माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी असेल, तर त्यांच्यासमोर मनोज घोरपडे किंवा धैर्यशील कदम असतील. याठिकाणी एकास एक लढत झाली तरच काहीतरी वेगळे पाहायला मिळेल, असे म्हटले जाते.

आमदार पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड दक्षिण - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघातून लढत देत आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला मानणारा आणि पाठीशी राहणारा आहे. मात्र, अतुल भोसले यांनीही यावेळी जोरदार तयारी केली केल्याने निवडणूक तेवढी सोपी असणार नाही. 

आमदार शंभूराज देसाई पाटण - पाटण मतदारसंघातून सलग निवडून देण्याची प्रथा नाही. गतवेळी मात्र शंभूराज देसाई यांनी ही किमया केलेली आहे.  कितीही कामे केली तरी लोक ज्यांना निवडून द्यायचे त्यांनाच देतात. त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा याठिकाणी लागणार आहे. 

आमदार मकरंद पाटील  वाई - वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तीन तालुक्यांसाठी असलेला हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर मकरंद पाटील यांची चांगली पकड आहे. पण शरद पवार काही नवीन खेळी करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

आमदार जयकुमार गोरे  माण -  आमदार जयकुमार गोरे हे याठिकाणी निवडणूक रिंगणात असतील, तर त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, रणजितसिंह देशमुख यांच्यापैकी एक जण करणार आहे. 

आमदार महेश शिंदे कोरेगाव - हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून आता शिवसेनेच्या ताब्यात गेला आहे. याठिकाणी शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यातच लढत होणार आहे. दोघांचीही प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लावली जाणार आहे. 

आमदार दीपक चव्हाण फलटण - विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे सलग चौथ्यांदा या मतदारसंघातून निवडून जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर त्यांना भाजपकडून सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

सध्याचे जिल्ह्यातील आमदारांचे बलाबलकाँग्रेस - ०१राष्ट्रवादी - ०१राष्ट्रवादी (श.प.)  - ०२शिंदेसेना - ०२भाजप  - ०२

संभाव्य लढतीसातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) विरुद्ध दीपक पवार, अमित कदम (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन मोहिते (उद्धवसेना) पाटण : शंभूराज देसाई (शिवसेना) विरुद्ध सत्यजित पाटणकर (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस)कऱ्हाड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध अतुल भोसले (भाजप)कऱ्हाड उत्तर : बाळासाहेब पाटील (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध मनोज घोरपडे (भाजप)कोरेगाव : महेश शिंदे (शिवसेना) विरुद्ध शशिकांत शिंदे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस)वाई : मकरंद पाटील (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध विराज शिंदे (काँग्रेस)फलटण : दीपक चव्हाण (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध सचिन कांबळे पाटील (भाजप)माण : जयकुमार गोरे (भाजप) विरुद्ध प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस)

सर्व विद्यमान लढणार सातारा विधानसभा मतदारसंघातून सर्व आठही आमदार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. 

नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार कासातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नवीन चेहरे लढण्यास उत्सुक आहेत. राजकीय पक्ष त्यांना किती संधी देतात यावर या निवडणुकीतील चुरस पहायला मिळणार आहे. काही ठिकाणी नव्यांना संधी मिळू शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी