शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रायफलची परवानगी द्या, म्हणत ग्रामसेवकाला मारहाण, साताऱ्यातील खामगाव ग्रामसभेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 16:50 IST

ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा प्रकार घडला.

जिंती : संरक्षणासाठी रायफल पाहिजे आहे, मला रायफल बाळगण्यासाठी परवानगी द्या, असे म्हणत ग्रामसेवकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार घडला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल शिवाजी जाधव (गोसावीवस्ती, रा. खामगाव, ता. फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फलटण तालुक्यातील खामगाव येथील ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा प्रकार घडला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ग्रामसेवक हणमंत विष्णू चव्हाण (वय ३७, रा. कोळकी, ता. फलटण मूळगाव शेवरी, ता. माण) यांच्याकडे खामगावचा ग्रामसेवक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीची मासिक बैठक सुरू असताना संशयित आरोपी अनिल शिवाजी जाधव ग्रामपंचायतीमध्ये येऊन म्हणाले, ‘मला संरक्षणासाठी रायफल पाहिजे. तुम्ही मला रायफल बाळगण्यासाठी परवानगी द्या’, असे म्हणून अर्ज बैठकीत दिला.यावेळी बैठकीमधील उपस्थित लोक त्याला समजावून सांगत असताना जाधव याने बैठकीमधील कोणाचेही ऐकून न घेता फिर्यादी ग्रामसेवक यांच्याजवळ जात ‘तुम्ही मला आता दाखला द्या, मी या ठिकाणाहून जाणार नाही,’ असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केली. याबाबत फिर्यादी ग्रामसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस